Shivsena  Saam Tv
महाराष्ट्र

Girl Named As Shivsena : काय सांगता! मुलीच नाव 'शिवसेना', बाळासाहेबांनीचं सांगितल्याचा दावा, पाहा कुठे घडलं...

डोंबिवलीतील वाडकर कुटुबियानी मुलीचे नाव शिवसेना ठेवले; बाळासाहेबांनी स्वप्नात येवून सांगितल्याचा कुटुंबाचा दावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख

Dombivli News : माझं नाव शिवसेना. या आशयाच्या प्रचाराची क्लिप काही वर्षापासून शिवसेनेकडून निवडणुकीत वापरली जातेय. सद्या शिवसेनेत फूट पडली असून दोन गट पडलेत त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. शिवसेनेवर बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या एका शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नावच चक्क शिवसेना ठेवलंय. या नावाची चर्चा कल्याण डोंबिवलीत सुरू झाली आहे.

पांडुरंग वाडकर हे डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात आपली पत्नी व दोन मुलींसह राहतात. पांडुरंग मूळचे महाड कीये येथील रहिवाशी आहेत. लहानपणापासून पांडुरंग हे शिवसेनेचे काम करत आहेत.

पांडुरंग वाडकर यांना गेल्या १७ ऑक्टोंबर मुलगी झाली. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवलं. त्यांच्या मूळ गावी महाड येथील कीये मुलीचे बारसे झाले. त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवून त्यांनी त्या नावाची नोंद ग्रुप ग्रामपंचाततीत केली आणि या नावाची चर्चा सुरू झाली.

एकीकडे शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले असताना शेलार नाका येथे राहणारे वाडकर यांच्या स्वप्नात चक्क बाळासाहेब आले. त्यांनी सांगितले की, घाबरु नकोस, तुझ्या घरात शिवसेना आहे. वाडकर यांना झालेला स्वप्नातील दृष्टांत पाहून ते झोपेतून खडबडून जागे झाले. त्यांनी त्यांना पडलेले स्वप्न ध्यानात घेऊन त्यांच्या मुलीचे नावच शिवसेना ठेवले. त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवून त्यांनी त्या नावाची नोंद ग्रुप ग्रामपंचाततीत केली आहे. त्यांच्या शिवसेना प्रेमाची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.

याबाबत पांडुरंग वाडकर यांनी लहानपणापासून शिवसेनेचे काम करतोय सध्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे हे पाहून दुःख झालं. १७ ऑक्टोबर रोजी रात्री झोपलो असताना अचानक बाळासाहेब स्वप्नात आले आणि मी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा बाळासाहेबांकडे ही खंत बोलून दाखवली.

त्या क्षणाला बाळासाहेब बोलले तू घाबरू नकोस शिवसेना तुझ्या घरात आली आहे. पुढे बोलताना वाडकर यांनी सांगितलं की त्या क्षणाला मला माझ्या फोन आला व मुलगी झाल्याचा मला समजलं. त्यामुळे मी मुलीचं नाव शिवसेना असं ठेवल्याचा वाडकर सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

SCROLL FOR NEXT