Shirur Accident Saam tv
महाराष्ट्र

Shirur Accident : पुणे- नाशिक महामार्गावर दोन विचित्र अपघात; गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू

Shirur News : अपघातातील एका अपघातात मालवाहू गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी

रोहिदास गाडगे

शिरूर (पुणे) : पुणे- नाशिक महामार्गावर पेठ गावच्या हद्दीत दोन विचित्र अपघात झाले. या दोन्ही अपघातातील एका अपघातात मालवाहू गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. 

शिरूर (Shirur) तालुक्यातील आरणगाव येथील अल्पवयीन मुलीने एका तरुणाला चिरडल्याची घटना ताजी असताना पुणे- नाशिक महामार्गावर शुभम दातखिळे हा अल्पवयीन तरुण मालवाहू पिकअप जीप घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. या दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या पिकअप महामार्गाच्या डिव्हाडरला धडकून अपघात झाला. यामध्ये अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या गाडीमध्ये बसलेल्या नवनाथ दातखिळे याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर अल्पवयीन पिकअप ड्रायवर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

दुसऱ्या अपघातात (Accident) मालवाहू ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात ट्रकमध्ये भरलेल्या लोखंडी पट्ट्या महामार्गावर पडल्या. या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Cooking Tips: भात चिकट होऊ नये म्हणून काय करायचं? वाचा एकदम सोपी ट्रिक

Maharashtra News Live Update: माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग

Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या

Air India CEO Resigns: एअर इंडियाच्या CEO चा तडकाफडकी राजीनामा, कोण संभाळणार टाटा ग्रुप एयरलाइनची कमान?

Coriander Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 'या' दाण्यांचे पाणी, पोटाची चरबी होईल झपाट्याने कमी

SCROLL FOR NEXT