Maharashtra Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिरुरमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का! बडा नेता अजित पवारांच्या गळाला; विधानसभेचे तिकीटही मिळणार?

Maharashtra Assembly Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळ पार पडला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

रोहिदास गाडगे

Maharashtra Politics News: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळ पार पडला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माऊली कटके हे विधानसभा लढण्यास इच्छुक होते. अशातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने अजित पवार गटाकडून ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षालाही माढ्यामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांच्या प्रवेशानंतर राका शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून अचानक नव्याने आलेल्या व्यक्तीला तिकीट कशी द्यायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT