Maval News
Maval News Saam Tv
महाराष्ट्र

Maval News : चांदखेड यात्रेत गाेळीबार; गुंड अविनाश गाेठेसह चाैघे अटकेत

दिलीप कांबळे

Maval Crime News : मावळ तालुक्यात गाव गुंडांनी चक्क यात्रेत गोळीबार केल्याची घटना घडली. या गाव गुंडांनी थेट हवेत गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली हाेती. ही घटना चांदखेडच्या यात्रेत घडली. या प्रकरणी पाेलिसांनी एकास अटक (arrest) केली आहे. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार यात्रेत दहशत निर्माण करण्याच्या हेतुने एकाने चांदखेडच्या यात्रेत (yatra) हवेत गाेळीबार केल्याची घटना समजल्यावर तातडीने पाेलिस पथक घटनास्थळी पाेचले. या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून तपास केला.

त्याआधारे अविनाश गोठे या ताब्यात घेतले. त्याची चाैकशी करुन त्यास अटक केली. गाेठे याच्या चाैकशीत आणखी काही जणांचा या गुन्ह्याशी संबंध असल्याची माहिती पाेलिसांनी मिळाली हाेती.

त्यानंतर शिरगाव पोलिसांनी आणखी तिघांना ताब्यात घेतले. या घटनेत गाेठेसह चाैघांना अटक केल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गोठेला यात्रेत दहशत निर्माण करायची असल्याने त्याने हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान चांदखेड यात्रेतील गाेळीबारच्या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे. या घटनेतील संशयितांना अटक केली असून ग्रामस्थांनी निर्भयपणे यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Lok Sabha : मावळ लोकसभेत मविआ उमेदवाराकडून अजित पवारांना वाकून नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Nashik Election: मोठी बातमी! महंत अनिकेत शास्त्री BJPकडून लोकसभा लढवणार? शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया 'साम'वर EXCLUSIVE

Sankarshan Karhade Poem | "तुम्ही कितीही बदला पक्ष...", कविता ऐकाच!

Mumbai Mega Block News: लोकल प्रवाशांनो, कृपया इथं लक्ष असू द्या! रविवारी नेमका कोणकोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या सविस्तर

Summer Tips: उन्हामुळे चेहरा काळवंडलाय? फॉलो करा या 5 टिप्स

SCROLL FOR NEXT