Shirdi Ram Navami Yatra Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Shirdi Ram Navami Yatra : शिर्डीच्या यात्रेत मोठी दुर्घटना! अचानक पाळणा तुटला अन्.., थरकाप उडवणारा VIDEO

Shirdi Yatra Accident News : साईबाबांच्या शिर्डीत भीषण अपघाताची एक घटना घडली. शिर्डीच्या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला आहे.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही

Shirdi Ram Navami Yatra News : साईबाबांच्या शिर्डीत भीषण अपघाताची एक घटना घडली. शिर्डीच्या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला आहे. अतिवेगाने फिरणारा पाळणा अचानक तुटल्याने चार जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून भाविक जखमी झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. दरवर्षी हजारो भाविक रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत दाखल होतात. यंदाही हजारो भाविक आपल्या कुटुंबीयांसोबत यात्रेत सहभागी झाले होते.

यात्रेत वेगवेगळे पाळणे आल्यामुळे भाविक त्यामध्ये बसून आनंद साजरा करत होते. साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील जागेत हे पाळणे लावण्यात आलेले आहेत. यातील एक पाळणा अचानक तुटला. यामुळे पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले. तर काहीजण पाळण्यात बसण्यासाठी बाजुला उभे होते त्यांच्यावर हे पाळणे आदळल्याने अनेकजण जखमी झाले.

या दुर्घटनेत ज्योती किशोर साळवे, वय-४५, किशोर पोपट साळवे, वय-५० यांच्या पायांना मोठी गंभिर दुखापत झाली आहे. याशिवाय भूमी अंबादास साळवे, वय-१४ हिला डोक्याला जखम झाली आहे. तसेच प्रवीण अल्हाट, वय-४५ हा तरुणही जखमी झाला आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी दाखल होत भाविकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. यात्रेंमध्ये असणाऱ्या पाळण्यात लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बसतात. त्यामुळे पाळण्यांच्या सुरक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT