Uddhav Thackeray And Aditya Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाने डाव टाकला, विखे पाटलांविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला?

Maharashtra Politics: घोगरे या लढवय्या असून परिवर्तंनाची सुरूवात लोणी गावातूनच होईल असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या विखेविरुद्ध महाविकास आघाडीच्या घोगरे असा सामना रंगणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. ८ जानेवारी २०२४

Maharashtra Political News:

नाशिकचा दौरा आटोपल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिर्डी दौरा केला. यावेळी खा. संजय राऊत यांनी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. या दौऱ्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या प्रभावती घोगरे संजय राऊत यांचे स्वागत केले. तसेच राऊतांनीही प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान संजय राऊत यांनी प्रभावती घोगरे या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार असतील.. असे सूचक वक्तव्यही केले आहे.

संजय राऊतांचे शक्तीप्रदर्शन..

खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यानंतर राऊत यांनी थेट विखे पाटलांच्या लोणी गावात जाऊन त्यांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. "घोगरे या लढवय्या असून परिवर्तंनाची सुरूवात लोणी गावातूनच होईल असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी भेटी दरम्यान केले. त्यामुळे आगामी शिर्डीमध्ये भाजपच्या विखेविरुद्ध महाविकास आघाडीच्या घोगरे असा सामना रंगणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

विखे पाटलांवर टीका..

तसेच "2024 ला राज्यात आणि देशात परिवर्तन होणार आहे. शिर्डीत आल्यावर आधी साईबाबांचे दर्शन घेतले आणि नंतर या झुंजार रणरागिणीला भेटण्यासाठी आलो. उध्दव ठाकरे यांनी देखील प्रभावती घोगरे यांची भेट घेण्यास सांगितले होते," असे म्हणत राऊत यांनी विखे पाटलांना (RadhaKrishna Vikhe Patil) टोला लगावला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहेत प्रभावती घोगरे?

प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogare) या लोणी खुर्द या गावाच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या कट्टर विरोधक मानल्या जातात. प्रभावती घोगरे यांचे सासरे स्वर्गीय चंद्रभान घोगरे हे 1978 साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये शिर्डी मतदासंघांचे पहिले आमदार होते. विखे पाटलांच्या कट्टर विरोधक तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय अशी प्रभावती घोगरे यांची ओळख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

Solapur : सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना;खरीप पिके जलमय | VIDEO

SCROLL FOR NEXT