Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; साई संस्थानकडून नविन डोनेशन पॉलिसी, या भक्तांनाही मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांचा भक्तगण मोठा आहे. देशभरातून रोज हजारोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई संस्थान वेगवेगळ्या सुविधा देत असते

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबा दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. यातील काही भाविक संस्थानला मोठ्या रक्कमेस्वरूपात डोनेशन देत असतात. अशा डोनेशन देणाऱ्या साईभक्तांसाठी साई संस्थानने नवीन डोनेशन पॉलिसी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे साईबाबांच्या व्हीआयपी आरतीचा लाभ भक्तांना घेता येणार आहे. 

शिर्डीच्या साईबाबांचा भक्तगण मोठा आहे. देशभरातून रोज हजारोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई संस्थान वेगवेगळ्या सुविधा देत असते. तसेच काही मागत्वाचे निर्णय देखील घेत असते. त्यानुसार डोनेशन देणाऱ्या भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी सुरू केली आहे. अर्थात या पॉलिसीमुळे १० हजार रुपयांची देणगी देणाऱ्या भाविकांना देखील व्हीआयपी आरतीचा लाभ मिळणार. 

यापूर्वी होती २५ हजाराची मर्यादा 

साईबाबांची व्हिआयपी आरतीसाठी यापूर्वी कमीत कमी २५ हजार रुपये देणगीची मर्यादा होती. मात्र आता नव्या डोनेशन पॉलिसीत मर्यादा घटवली आहे. अर्थात २५ हजार रुपयांची असलेली हि मर्यादा आता १० हजारांवर आणली आहे. म्हणजेच १० हजार रुपये देणगी देणाऱ्या साईभक्तांना देखील व्हिआयपी आरतीचा लाभ देण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. 

अशी आहे नवीन डोनेशन पॉलिसी 

नवीन डोनेशन पॉलिसीनुसार १० ते ५० हजार देणगी देणाऱ्या भाविकाच्या कुटुंबातील पाच सदस्यांना एकवेळच्या आरतीचा लाभ मिळणार आहे. तर ५० हजार ते १ लाख रुपये देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ मिळेल. १ लाख ते १० लाख देणाऱ्या भाविकांना दोन आरत्यांचा लाभ तसेच आजीवन मात्र वर्षातून एकदा व्हीआयपी मोफत दर्शन मिळणार आहे. तर ५० लाख किंवा त्यापेक्षा पुढील देणगीसाठी तीन व्हिआयपी आरती व आजीवन मात्र वर्षातून दोनदा मोफत व्हिआयपी दर्शनाची सुविधा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

Shepu Batata Bhaji Recipe: शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

SCROLL FOR NEXT