Sai Baba Mandir Trust News Saamtv
महाराष्ट्र

Sai baba Temple: देशभरात साईमंदिर उभारण्यासाठी ५० लाख देणार, साई संस्थानच्या प्रस्तावाविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण

Shirdi News: माजी नगराध्यक्षा अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी आजपासुन साई मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, प्रतिनिधी

Shirdi News:

शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देशभरात साईबाबा मंदिर निर्माणाला 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मांडल्याने शिर्डीकर आक्रमक झाले आहेत. माजी नगराध्यक्षा अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी आजपासुन साई मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध पक्ष, संघटना आणि ग्रामस्थांनी पाठींबा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डीच्या (Shirdi) साईबाबा संस्थानने (Sai Baba Sansthan) देशभरात साई मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेण्याचे जाहीर केले होते. तसेच या साई मंदिरासाठी ५० लाखांची आर्थिक मदत देण्याचाही प्रस्ताव साईबाबा संस्थानने मांडला होता. या प्रस्तावाविरोधात शिर्डीमधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

हा निर्णय घेण्याअगोदरच माजी नगराध्यक्षा अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आमरण उपोषणाला शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.

त्रिसदस्यीय समिती हटाव, साईबाबा संस्थान बचाव, अशा घोषणा देत आंदोलक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिर्डीत अनेक समस्या आहेत. शिर्डीचा विकास रखडलेला आहे असे असताना साई संस्थानचा पैसा बाहेर देऊ नये अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी घेतली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षणासाठी घरातून पळाली अन् रेड लाइट एरियात अडकली; तिथून निसटली, पण शेतात काढावी लागली अख्खी रात्र

Local Body Election: शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

Politics : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महिला नेत्याला घेतलं ताब्यात; काय आहे प्रकरण?

Wedding Mandap Importance: लग्नात घराबाहेर अंगणात मंडप का बांधतात? यामागचं शास्त्र काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT