Kopargaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Kopargaon Crime : साई भक्तांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार; सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

Shirdi News : गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी अडविली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

कोपरगाव (अहिल्यानगर) : शिर्डीत साई दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. मात्र शिर्डीत येणाऱ्या साई भक्ताची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना १६ फेब्रुवारीला कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना लुटमारी करणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कारने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी अडविली. यावेळी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली.

दागिने, रोख रक्कम घेऊन पसार 

मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांचे पथक आणि कोपरगाव पोलिस यांनी समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

आरोपींमध्ये दोन अल्पवयीन 

पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाडे, सागर दिनकर भालेराव, समीर रामदास माळी आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून लोखंडी कत्ती, गावठी कट्टा, एअर गण, धातूच्या अंगठ्या, चैन असा ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.


जबरी चोरीचे चार गुन्हे 
सदर घटनेतील आरोपींनी याआगोदरही दरोडा आणि जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर आरोपींनी रोख रक्कम आपापसात वाटून घेत सोन्या चांदीचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे. रस्तालूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

SCROLL FOR NEXT