Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Crime : पोलीस बनून तपासणीच्या नावाने लुबाडणूक; तोतया पोलिसाला घेतले ताब्यात

Shirdi News : शिर्डी पोलिसांनी सदरची कामगिरी केली आहे. पोलिस असल्याची बतावणी करणारा एक इसम शिर्डीतील भक्त निवास परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांना मिळाली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीमध्ये भाविकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र पोलीस असल्याची बतावणी करून भक्त निवासमध्ये फिरत वृद्ध नागरिकांची फसणूक केली जात होती. हा तोतया पोलीस शिर्डी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या विविध पोलीस ठाण्यात २० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. 

शिर्डी पोलिसांनी सदरची कामगिरी केली आहे. पोलिस असल्याची बतावणी करणारा एक इसम शिर्डीतील भक्त निवास परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांना मिळाली. यानंतर पथकासह त्या ठिकाणी पोहोचले. पोलिस आल्याची चाहूल लागतच संबंधित व्यक्ती पळून जाण्याचा तयारीत होता. मात्र शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान (वय ३०) असे तोतया पोलिसाचे नाव आहे. 

वृद्धांना हेरून करायचा लुबाडणूक 

जाकीर हा वृद्ध नागरिकांना हेरायचा. यानंतर पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडील दागिने, पैसे लंपास करायचा. आज शिर्डीतील पाचशे रूम भक्त निवास परिसरात सावज शोधत असतानाच शिर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या नावाने खोटे ओळखपत्र 

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील जाकीर खान हा रहिवासी आहे. त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि लोणी पोलिस ठाण्यासह राज्यातील विविध पोलिस ठाण्यात २० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी जाकीर खान याच्याकडे अनेक खोटी ओळखपत्र आणि विना नंबरची दुचाकी मिळून आली. तर त्याच्याकडे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक पाटील नावाने खोटे ओळखपत्र मिळून आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT