Shirdi Sai Sansthan Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Sansthan : साई संस्थानला ८३ ग्रॅमचे सुवर्णफुल दान; सव्वातीन लाखाची दुचाकीही केली अर्पण

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अनेक भाविक देणगी स्वरूपात रोख रक्कम किंवा काही वस्तू देत असतात. वर्षभर येथे येणाऱ्या भाविकांकडून देणगी देणाऱ्यांची कमी नाही

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : सलग सुट्या व नवीन वर्षानिमित्ताने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक (Shirdi) गर्दी करत आहेत. तर या दरम्यान काही भाविकांकडून देणगी, दान दिले जात आहे. अशाच प्रकारे (Saibaba) साईबाबा संस्थानला ८३ ग्राम वजनाचे सुवर्णफुलं व सव्वातीन लाख रुपये किमतीची दुचाकी देणगी स्वरूपात दिली आहे. (Breaking Marathi News)

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अनेक भाविक देणगी स्वरूपात रोख रक्कम किंवा काही वस्तू देत असतात. वर्षभर येथे येणाऱ्या भाविकांकडून देणगी देणाऱ्यांची कमी नाही. अशात सध्या सलग सुट्या यात दत्त जयंती आणि नववर्षनिमित्ताने भाविकांचा ओघ सुरु आहे. यात साईबाबा संस्थानला ८३ ग्राम वजनाचे ४ लाख ७७ हजार रुपये किमतीचे सुवर्णफुल देणगी स्वरुपात प्राप्त झाले आहे. भुवनेश्वर येथील (Saibaba Sansthan) साईभक्त संभूनाथ सवाई यांनी हे सुवर्ण दान संस्थानला दिले आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे दान सुपूर्त करण्यात आले असून देणगीदार सवाई यांचा साई संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सव्वा तीन लाखाची दुचाकी दान 

नव्यानेच लॉन्च केलेली सव्वा तीन लाख रुपये किमतीची अपाचे ३१० ही दुचाकी कंपनीनेच साईबाबा संस्थानला दान स्वरूपात दिली आहे. या दुचाकीचे साई मंदीर परिसरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.  यावेळी टीव्हीएस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुचाकीची चावी संस्थान अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT