Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News: बोगस पी.ए., एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एन्ट्री’; भक्तांची दिशाभूल करून सुरू होता गोरखधंदा

बोगस पी.ए., एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एन्ट्री’; भक्तांची दिशाभूल करून सुरू होता गोरखधंदा

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : साईबाबांचे (Sai Baba) व्हीआयपी दर्शन घडवून देणारे एजंट त्याचप्रमाणे आमदार, खासदार आणि विश्वस्तांचे बोगस पी.ए. यांना आता चाप बसणार आहे. बोगस पी.ए आणि एजंट यांना साईमंदिर परीसरात नो एन्ट्री केली जाणार आहे. साई संस्थानच्या (Saibaba Sansthan) या निर्णयाने साईभक्तांची दिशाभूल करून गोरखधंदा करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. (Letest Marathi News)

साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येत असतात. मंत्री, खासदार, आमदार यासह अनेक व्हीआयपी देखील साई दर्शनाला येतात. साई संस्थानच्या नियमावलीनुसार महत्वाच्या आणि अतिमहत्‍त्वाच्या व्यक्तींना कमी वेळेत दर्शन मिळावे; यासाठी आमदार, खासदार, महत्वाचे व्यक्ती यांना खाजगी पी.ए. नेमण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत पी.ए. असल्याचे भासवून वैयक्तिक संबंधातील व्यक्तींना व्हीआयपी दर्शन घडवून देण्यासाठी साईमंदिर परिसरात दररोज अनेकांची लगबग सुरू असते.

संस्‍थानला द्यावे लागेल पत्र

यासंबंधी तक्रार प्राप्त होताच साईसंस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीने कठोर पाऊले उचलली आहेत. ज्यानुसार यापुढे आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, विश्वस्त यांना स्विय सहाय्यकाचे अधिकृत पत्र साईबाबा संस्थानला द्यावे लागणार आहे.

त्‍या कर्मचारींवर होईल कठोर कारवाई

साई संस्थानमधील काही कर्मचारी देखील अशा प्रकारच्या गैर कृत्यांमध्ये सामील असल्याच्या तक्रारी तदर्थ समितीला प्राप्त झाल्या. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली जर कर्मचारी गोरखधंदा करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करणार असल्याचे प्रभारी सीईओ राहुल जाधव यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबई एअरपोर्टपर्यंतचा प्रवास होणार सुसाट, ४ पदरी पूल बांधणार; कसा असणार प्लान?

Shocking: 'त्या दाढीवाल्या आजोबानं माझ्या...'. ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शेजारी राहणाऱ्याचं भयंकर कृत्य

Maharashtra Live News Update: दहशतवांद्यांना कठोर शिक्षा झाली पाहीजे : खासदार राघव चड्डा

Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

Famous Artist Death: थराररक! 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रसिद्ध आर्टिस्टचा २९ व्या वर्षी मृत्यू; सिंहाने जबडा खाल्ला

SCROLL FOR NEXT