Ashok Chavan Saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan : काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन म्हणून लोक स्वतःहून दुसऱ्या पक्षात जाताय; खासदार अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल

Shirdi News : दक्षिणेत आजही प्रादेशिक पक्षांचं मोठं अस्तित्व आहे. मुळात ज्या पक्षाशी जनतेचा संपर्क असतो, तो पक्ष कधीही संपवू शकत नाही. मग तो प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहिल्यानगर)
: काँग्रेसचे नेतृत्वच दिशाहीन आहे. त्यामुळे काँग्रेसला फोडण्याची गरज राहिलेली नाही. लोकांना काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाही ही वस्तुस्थिती झाली आहे. काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाल्याने अनेकजण काँग्रेस सोडून अन्य पक्षात जात आहेत; अशा शब्दात खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण हे आज शिर्डी येथे साई दरबारी आले होते. सहकुटुंब त्यांनी साई दर्शन घेतले. दर्शनानंतर साईबाबा संस्थानतर्फे चव्हाण कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

जनतेचा संपर्क असलेला पक्ष संपवू शकत नाही 

दक्षिणेत आजही प्रादेशिक पक्षांचं मोठं अस्तित्व आहे. मुळात ज्या पक्षाशी जनतेचा संपर्क असतो, तो पक्ष कधीही संपवू शकत नाही. मग तो प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो. पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये होतो, त्यामुळे त्या पक्षाच्या अधोगती विषयी बोलणं योग्य वाटत नाही. मी माझी दिशा स्वीकारली आहे आणि मी आहे त्या ठिकाणी आता समाधानी असल्याचे खासदार चव्हाण यांनी म्हटले आहे. 

आपल्याला पक्षाची आयडॉलॉजी घेऊन चालावे लागते
संजय राऊत यांनी भाजपमध्ये उपरे असल्याचे वक्तव्य केले. यावर बोलताना खासदार चव्हाण म्हणाले, कि अनेक जण वेगवेगळ्या पक्षात येतात जातात. ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची आयडॉलॉजी घेऊन चालावे लागते. त्यामुळे कोण उपरं झालय हे म्हणण्यात अर्थ नाही. काँग्रेसमध्ये देखील मधल्या काळात अनेक दुसऱ्या पक्षातले लोक आले होते. अशी प्रक्रिया सुरूच असते. राजकीय परिस्थितीचा तो परिणाम असतो. प्रत्येकाला आपलं राजकीय भवितव्य सुखरूप वाटतं त्या ठिकाणी तो जात असतो.

राहुल गांधींच्या वक्तव्यावर काय म्हणाले चव्हाण 

अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना पंजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती; असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, कि त्यांच्या विधानावर टिप्पणी करायची नाही. मात्र देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन त्या त्या वेळी त्या त्या पंतप्रधानांनी घेतलेले ते निर्णय आहेत. ते चूक की बरोबर त्यावर मी काही भाष्य करणार नाही. परंतु आज देखील अतिरेकी हल्ल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानला शरण यावे लागेल अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT