सचिन बनसोडे
शिर्डी (अहमदनगर) : साईबाबांच्या दर्शनासाठी तासन्तास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची सुटका होणार आहे. कारण (Saibaba Sansthan) साईबाबा संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून अद्ययावत आणि पूर्ण वातानुकूलीत अशी दुमजली दर्शनरांग बनवली असून लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे. (Breaking Marathi News)
साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) दर्शनासाठी दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक शिर्डीत येत असतात. साई समाधीच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्तास दर्शन रांगेत उभे रहावे लागते. त्यातच दर्शनपास कांऊटर, लॉकर, चप्पल स्टॅण्ड, लाडू कांऊटर, डोनेशन कांऊटर, ऊदी स्टॉल, टॉयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. मात्र आता एकाच छताखाली या सर्व सुविधा करण्यात आल्याने भाविकांच्या वेळेची बचत होणार आहे.
११ हजार भाविक थांबू शकतील
कोट्यवशी रुपये खर्च करून बनवलेली अद्ययावत दर्शनरांग ही संपूर्ण वातानुकूलीन आणि भूकंप निरोधक असून यात साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी यात घेण्यात आली आहे. या दर्शन रांगेत एकाचवेळी ११ हजार भाविक थांबू शकतील असे १२ वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधेसह महिला आणि लहान मुलांना देखील विशेष सुविधा इथे उपलब्ध असतील.
मार्चमध्ये लोकार्पण शक्य
नव्याने बांधण्यात आलेल्या या अद्ययावत दर्शनव्यवस्थेमुळे देश- विदेशातून आलेल्या भाविकांना साईबाबांचे आनंददायी आणि सुरक्षीत दर्शन घेता येणार असल्याने हा प्रकल्प साईभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या अद्ययावत दर्शन रांगेचे लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये हा लोकार्पण सोहळा अपेक्षित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.