Ahilyanagar Shirdi Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Crime : शिर्डी हादरली! तरुणाला अपहरण करून संपवलं, टायरमधील मृतदेह डिझेल टाकून जाळला

Ahilyanagar Shirdi Crime News : शिर्डीत २१ वर्षीय तरुणाचं अपहरण करून अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून हत्या करण्यात आली. आरोपींनी मृतदेह टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • सचिन गिधेचं शिर्डीतून अपहरण करून हत्या करण्यात आली

  • आरोपींनी मृतदेह टायर-डिझेलने जाळल्याची कबुली दिली

  • संगमनेर तालुक्यातील मेंढवणमध्ये पोलिसांनी सापळा रचून अटक केली

  • मुख्य आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

शिर्डीतील तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करत मृतदेह टायर आणि डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काही तासांत गुन्हेगारांना अटक केली असून पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. मृत तरुणाचे नाव सचिन गिधे असे आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर रोजी शिर्डीतील सचिन गिधे या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर फरार झालेले आरोपी सातत्याने ठिकाणं बदलत पोलिसांना चकवा देत होते. अखेर पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संगमनेर तालुक्यातील मेंढवण परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून गिधे यांची हत्या करून मृतदेह जाळून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणातील कुख्यात आरोपी दिपक पोकळे याच्यावर याआधी मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडे आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

या हत्येचा पुढील तपास राहाता पोलिस करत असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT