Radhakrishna Vikhe Patil, Shirdi  saam tv
महाराष्ट्र

Shirdi Bandh च्या निर्णयावर राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

Shirdi Bandh News: ग्रामस्थ आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांची झाली भेट.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi News : शिर्डी येथील साई संस्थान (sai sansthan shirdi) येथे सीआयएसएफ (CISF) ही केंद्रीय सुरक्षा यंत्रणा व आयएएस अधिकारी नको तसेच विविध मागण्यासाठी येत्या एक मे राेजी ग्रामस्थांनी शिर्डी बंदची (shirdi bandh) हाक दिली हाेती. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांची ग्रामस्थांनी भेट घेत चर्चा केली. या चर्चेत काही सकारात्मक गाेष्टी ठरल्याने ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा निर्णय मागे घेतला आहे. त्याबाबत पालकमंत्री यांनी दुजाराे दिला. (Breaking Marathi News)

शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येऊन युवकांना साथ देत विविध मागण्यांसाठी तसेच साई संस्थानच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई उभारण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयाकडे सरकारचे लक्ष खेचण्यासाठी महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे पासून शिर्डी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच दिवशी संध्याकाळी ग्रामसभेचे आयोजन करून चार विषयांचा ठराव घेण्याचे निश्चित केले हाेते.

दरम्यान आज (शुक्रवार) पालकमंत्री विखे पाटलांची ग्रामस्थांनी भेट घेतली. या भेटीत विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या विविध मागण्या जाणून घेतल्या. तसेच ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या उच्च न्यायालयापर्यंत पोहचवू. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडेल. शिर्डीशी संबंध नसणारी मंडळी जनहित याचिकेतून शिर्डीत हस्तक्षेप करतात अशी नाराजी याचिकाकर्त्यांसंदर्भात विखे पाटलांनी यावेळी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT