Shinde Vs Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray: धनुष्यबाण कुणाचा शिंदेचा की ठाकरेंचा? सर्वोच्च न्यायालयात काउंटडाऊन सुरु

Shinde Vs Thackeray on Dhanushyaban Logo: धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण चिन्हा शिंदे गटाला मिळणार की ठाकरे गटाला याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात धनुष्यबाण चिन्हावरुन वाद पेटला आहे. हे चिन्ह आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता शिवसेना चिन्ह आणि पक्षावरच्या सुनावणीचा दिवस अखेर ठरलाय. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय होणार?

धनुष्यबाण कुणाचा शिंदेचा की ठाकरेंचा?

सर्वोच्च न्यायालयात काउंटडाऊन सुरु

'शिवसेने'च्या सुनावणीची तारीख ठरली

पालिका निवडणुकीच्या तोंडावर निकाल येणार?

जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या शिवसेना चिन्ह आणि पक्षाच्या निकालावरून उद्धव ठाकरेंचा हा संताप तुम्ही अनेकदा पाहिला असेल त्यातच आता शिवसेनेवरील मालकीच्या वादावरचा अंतिम निकाल लवकरच समोर येणार आहे.. काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेनं सर्वोच्च न्यायालयाला याप्रकरणी तातडीनं सुनावणीची विनंती केली होती..त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरेंनीही भरसभेत लोकशाही तडपतेय तिला वाचवा, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती...

मुळात राष्ट्रपती सल्ला प्रकरणाच्या सुनावणीमुळे शिवसेना पक्षासंदर्भातील सुनावणी पुढील महिन्यात 8 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे..

दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाच्या या वादात सर्वोच्च न्यायालय नेमकं काय अंतिम निर्णय देणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांपैकी निकाल नेमका कोणाच्या बाजूनं लागणार? यावर राज्याच्या पुढच्या राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : आज राज्यभरात ११ दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात येणार

Healthy Rice : मधुमेहापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत 'हे' ५ तांदळाचे प्रकार करतील अनेक आजारांवर मात

48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

SCROLL FOR NEXT