Shinde Sena MLA Sanjay Gaikwad, known for repeated controversies, now sparks outrage by challenging late Shiv Sena founder Balasaheb Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: गायकवाडांनी काढला शिवसेनेचा बाप, शिदेंच्या आमदारांचं थेट बाळासाहेबांनाच आव्हान

Sanjay Gaikwad Challenges Balasaheb Thackeray: महाराष्ट्रातील विधीमंडळात आपण लोकोपयोगी कामं करण्यासाठी आमदार निवडून देतो. पण याच विधीमंडळातील आमदार सध्या कामांऐवजी वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आहेत. शिंदेच्या आमदारांनी आता थेट कोणाला आव्हान दिलंय.

Snehil Shivaji

शिंदेगटाचे संजय गायकवाड आणि वाद हीच आमदार महोदयांची उभ्या महाराष्ट्राला ओळख. कधी मारहाणीमुळे तर कधी काहीतरी बरळल्यामुळे...दर महिन्याला ते एकतरी वाद ओढवून घेतात...आणि आता तर त्यांनी थेट शिवसेनेचाच बाप काढलाय...म्हणजे स्वर्गिय बाळासाहेब ठाकरेंनाच आव्हान दिलंय.

ऐकलंत हे तेच आमदार आहेत ज्यांनी थेट बाळासाहेबांनाच आव्हान दिलं. ज्या बाळासाहेबांनी त्यांना ३ वेळा नगरसेवक केलं. नगराध्यक्ष केलं. ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना २ वेळा विधानसभेत पाठवलं त्या उद्धव ठाकरेंच्या वडिलांना आणि ज्या शिंदेंनी त्यांना पुन्हा तिकीट देऊन विधानपरिषदेत पाठवलं त्या शिंदेच्या शिवसेनेच्या प्रमुखांना या आमदार महाशयांनी दिलेलं आव्हान पुन्हा ऐका..

इथं दोनदा उबाठाच्या बापालाही जमणार नाही असं वाक्य लावा

आमदार गायकवाडांची जीभ घसरल्यानंतर त्यांनी सवयी प्रमाणे पुन्हा पलटी मारली

गायकवाडांनी यापूर्वी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाच्या मतदारांनाबद्दलही गरळच ओकली होती. त्यांच्या वादांच्या मालिकेवर एक नजर टाकूया..

19 एप्रिल 2021

'कोरोनाचा विषाणू मिळाला तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन'

1 फेब्रुवारी 2024

'कमरेत लाथ मारुन भुजबळांना मंत्रीमंडळातून हाकला'

24 फेब्रुवारी 2024

वाघाची 1987 मध्ये शिकार करुन वाघाचा दात गळ्यात घातल्याचा दावा

1 मार्च 2024

शिवजंयतीच्या मिरवणुकीत पोलिसांच्या काठीनं तरुणाला बेदम मारहाण

17 ऑगस्ट 2024

मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापला आणि पत्नीला तलवारीनं भरवला केक

16 सप्टेंबर 2024

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा

5 जानेवारी 2025

'विधानसभा निवडणुकीत मतदार दोन-दोन हजारात विकले गेले, तुमच्यापेक्षा तर वेश्या बऱ्या'

6 जुलै 2025

'छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या ते मुर्ख होते का?'

9 जुलै 2025

आमदार निवासात कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण

अशी वादग्रस्त कारकीर्द असलेल्या संजय गायकवाडांचा राजकीय प्रवास कमालीचा बहुरंगी आहे....आधी शिवसेना, मग छावा संघटना, त्यानंतर भाजप...मग राष्ट्रवादी...त्यानंतर मनसे आणि मग पुन्हा संयुक्त शिवसेना आणि आता शिंदेसेनेचे आमदार...गायकवाडांनी नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बॅनरवरुन शिंदेंचाही फोटो गायब केल्यानं चर्चेचा विषय ठरले होते. अशा वादग्रस्त आमदारावर कारवाईबाबत त्यांचे पक्षप्रमुख बोटचेपी भूमिका घेतात म्हणून गायकवाडांसारख्या वाचाळवीरांचं फावतं एवढं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील प्रताप चौकात दारूड्यांचा राडा

Maharashtra Tourism: महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करताय, मग 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT