Political speculation rises as leaders from Shinde and Thackeray factions show signs of possible reconciliation in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

शिंदेसेना नेत्यांना मातोश्रीचं दार उघडणार? शिंदेसेनेचे नेते राऊतांची ऑफर स्वीकारणार? दोन्ही शिवसेना एकत्र येणार?

Shinde Sena Matoshree Return Raut Offer Thackeray: शिंदेसेनेच्या नेत्यांना मातोश्रीचं दार उघडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय... आणि त्याला कारण ठरलंय... ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदेसेनेला दिलेली ऑफर... राऊतांनी शिंदेसेनेला काय ऑफर दिली? शिंदेसेना आणि ठाकरेसेना एकत्र येणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी ही इच्छा व्यक्त केल्यानंतर अवघ्या ४ तासांत शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काय विधान केलंय ते आता ऐका...शिंदेसेनेचे आमदार असलेल्या सत्तारांनी भाजपविरोधात ही उद्वीग्न प्रतिक्रिया दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २ जून २०२६ सकाळी १० वाजता राऊतांची शिंदेसेनेच्या नेत्यांना ही थेट ऑफर....24 तासांतल्या या सर्व घडामोडी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावतील अशी आणखी एक घटना घडली आणि ती म्हणजे भर रस्त्यावर जाहीरपणे ठाकरेसेनेचे नेते अंबदास दानवे आणि शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांची ही गळाभेट...

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीत झालेल्या बंडखोरीने आधीच टेन्शन वाढलंय. त्यातच शिंदेंच्या नेत्याचा भाजपवरचा थेट आरोप आणि ठाकरे गटाची ही खुल्ली ऑफर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत देत आहे. ४ वर्षांपूर्वी, म्हणजेच २० जून २०२२ ला राज्यसभेच्या निवडणुकीच्या दिवशीच शिंदेंनी बंड केलं होतं. आता पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर दुरावलेले नेते ठाकरेंच्या सोबतीला परतणार का? कारण राजकारणातील भेटीगाठी कधीच योगायोगानं नसतात.

आणि राजकारणात टायमिंगलाही मोठं महत्त्व असतं. म्हणूनच सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. ठाकरेसेनेच्या या हालचालींमुळे शिंदेंपुढे आपल्या नेत्यांना सोबत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. त्यामुळेच की काय उद्धव ठाकरेंनीही बेरजेच्या राजकारणाला सुरूवात तर केली नाही ना अशी चर्चा आता रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

QR Payment : गुगल पे, फोनपे, QR कोड पेमेंट स्वीकारणे बंद होणार? 'हा' नियम लगेच जाणून घ्या

High blood pressure: रोज सकाळी BP वाढतोय? ही 5 ड्रिंक्स नैसर्गिकरित्या कमी करतील रक्तदाब

Maharashtra News Live Update: घरपट्टी कराचा वाद कायम, तरीही पालिकेच्या तिजोरीत तब्बल 20 कोटी जमा!

Stress Increase Diabetes: टेंशनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते का? जाणून घ्या डायबिटीजच्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! फिटमेंट फॅक्टरनुसार मिळू शकतो ₹14.10 लाखांपर्यंत एरियर, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT