Eknath Shinde Upset With Sanjay Shirsat And Bachchu Kadu? Internal Rift In Shinde Sena saam tv
महाराष्ट्र

शिंदे गटात अंतर्गत वाद! एकनाथ शिंदे मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडूंवर नाराज; धक्कादायक कारण आलं समोर

Shinde Camp Faces Internal Tension: मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी 'सीजेपी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांची भेट घेतल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जातंय. या घडामोडीमुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Bharat Jadhav

  • सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या भेटीवरून शिंदे गटात नाराजी

  • एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती.

  • महायुतीतील राजकीय समन्वयावर या भेटीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची चर्चा.

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील भिडूंवर नाराज झालेत. एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण ठरलंय बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी घेतलेली सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट.

दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पक्षाच्या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांना शिंदे गटातील दोन प्रमुख नेते भेटले. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ आणि विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांनी दीपकेंची भेट घेतली. त्यांच्या या कृतीवर पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर नाराज झालेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील घटक पक्ष शिवसेना असताना कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके याला परस्पर का भेटले ? असा प्रश्न विचारत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं.आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकार झुकले आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. प्रधान यांचा राजीनामा घेणं हे एनडीएसाठी एक मोठा धक्का मानलं जातंय.

त्याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दरम्यान त्यानंतर जेव्हा अभिजीत दिपके हे त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन दिपके यांची भेट घेतली. या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झालेत.

महायुतीची भूमिका ठरली नसतानाही अभिजीत दिपके यांची भेट का घेतली असा सवाल करत शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना खडसावल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. महायुतीची भूमिका ठरलेली नसताना अशाप्रकारे न विचारता अभिजीत दिपके यांची भेट घ्यायला नको होती असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांना कानउघडणी केल्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाहीये. तसेच या विषयावर शिंदे, शिरसाट किंवा बच्चू कडू यांच्याकडून अधिकृत निवेदनही समोर आलेले नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT