santosh bangar  saam tv
महाराष्ट्र

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरको गुस्सा क्यो आता है? साम टीव्हीला स्पष्टच सांगितलं

मतदारसंघातील प्रश्न सोडवताना आमदार संतोष बांगर इतके का भडकतात असा प्रश्न अनेकांना पडलाय, यावर स्वत: आमदार संतोष बांगर यांनी उत्तर दिलं आहे.

संदीप नागरे

Santosh Bangar News : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे वारंवार आपल्या वादग्रस्त विधान आणि आंदोलनामुळे नेहमी चर्चेत राहत आहेत. अगोदर मध्यान्ह भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्रालदाराला मारहाण, त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठेवत पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची केलेली तोडफोड आणि आता थेट राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला केलेली शिवीगाळ. यामुळे पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर हे चर्चेत आले आहेत.

सत्ताधारी असलेल्या आमदार बांगर यांना अशी वादग्रस्त आंदोलने करण्याची वेळ का येते आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवताना आमदार संतोष बांगर इतके का भडकतात असा प्रश्न अनेकांना पडलाय, यावर स्वत: आमदार संतोष बांगर यांनी उत्तर दिलं आहे.

मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीवर भाष्य करताना संतोष बांगर (Santosh Bangar) म्हणाले, 'माझ्यासोबत माझे कार्यकर्ते, पीए मंत्रालयात जात होतो. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने मला थांबवलं. त्यानंतर माझ्या कार्यकर्त्याने त्यांना मी आमदार असल्याचे सांगितलं. त्यानंतर आम्ही एकमेकांना नमस्कार घातला. त्यानंतर मी माझ्या 'पीए'ला डायरीत नोंद करण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस (Police) कर्मचाऱ्याच्या समोरून मंत्रालयातून बाहेर पडलो. मात्र, त्या पोलीस कर्मचाऱ्याला गैरसमज झाला. त्या भीतीपोटी त्यांनीही डायरीवर नोंद केली. 'त्या ठिकाणी वाद झाला असेल, तर त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. ते तपासून घ्यावेत'

अवैधधंद्याच्या आरोपावर भाष्य करताना बांगर म्हणाले, 'चंद्रकांत खैरे यांना बोलण्याचा अधिकार नाही. चंद्रकांत खैरे काय आहेत, हे सर्व लोकांना माहीत आहेत. खैरे यांची पात्रता देखील नाही. खैरे यांचे आरोप चुकीचे आहेत'.

आमदार संतोष बांगर इतके का भडकतात , या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, 'राग येण्याचं कारण नाही. सर्व सामान्य लोकांवर अन्याय होतो, त्या अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम शिवरायांचा मावळा आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी सतत करत असतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील किंमती वाचा

Kolhapur : नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठे! जावयाला लग्नात दिली तब्बल दीड किलो चांदीची चप्पल, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

Khopoli Tourism : थंडगार वातावरण अन् अ‍ॅडव्हेंचर, वीकेंडसाठी परफेक्ट आहेत खोपोलीतील 'ही' ठिकाणे

Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT