NDA Party Member Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Assembly Election: महायुतीत बंडाचा झेंडा! शिंदे गटाच्या नेत्याने दंड थोपटले; मकरंद पाटलांविरोधात मैदानात उतरणार?

Maharashtra Assembly Election 2024: . रामराजे नाईक निंबाळकर आमच्या शेजारच्या तालुक्यात आहेत ते माझ्या गुरू समान आहेत मी त्यांना विनंती करेन त्यांनी या निवडणुकीत माझ्याबद्दल विचार करावा, असेही पुरुषोत्तम जाधव यांनी म्हटले आहे.

ओंकार राजेंद्र कदम

Wai Khandala Assembly Election: विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता वाई विधानसभा मतदार संघातील वातावरण चांगलंच कापलं आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या विरोधात आता युतीमधूनच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी शड्डू ठोकला आहे.

यावेळी मकरंद पाटील यांना पाडण्यासाठी मला जे करावे लागेल ते मी करणार असा एक प्रकारे इशाराच त्यांनी दिला आहे. गेले दहा दिवस ते वाई विधानसभा मतदार संघामध्ये गावोगावी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीला पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मी निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली आहे.

पुरुषोत्तम जाधव बंडखोरीच्या तयारीत?

"गेली वीस वर्ष महायुतीच्या बरोबर काम करत आहे. जेव्हापासून मुख्यमंत्री शिवसेना पक्षातून बाहेर गेले तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. मला त्यावेळी पासून त्यांनी पक्षबांधणी करण्यासाठी सुरुवात करा असा आदेश दिला होता, तेव्हापासून मी पक्ष बांधणी केलेली आहे. आता अचानक ज्यांच्याविरोधात आम्ही संघर्ष केला ते स्वतःच आमच्याकडून बसले असतील तर हे आम्हाला युतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे जर मला उद्या अपक्ष लढावं लागलं तर मी लढणार आहे, असा इशारा पुरुषोत्तम जाधव यांनी दिला.

"मी गेले दहा दिवसापासून जनसंवाद यात्रा काढून मतदार संघातील गावोगाव फिरले आहे. या गावांमध्ये सध्याचा आमदारांबद्दल असलेला आक्रोश पाहिला आहे. सर्व पद स्वतःच्याच घरात पाहिजेत ही जी त्यांची भावना आहे त्यामुळे त्यांच्या जवळचे कार्यकर्तेसुद्धा आता नाराज आहेत. स्वतःचाच घरात सर्व पद असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत की मेले असा प्रश्न सगळ्यांना आता पडायला लागला आहे. रामराजे नाईक निंबाळकर आमच्या शेजारच्या तालुक्यात आहेत ते माझ्या गुरू समान आहेत मी त्यांना विनंती करेन त्यांनी या निवडणुकीत माझ्याबद्दल विचार करावा.

दरम्यान, "मागील निवडणुकीत भाजपचे असलेले उमेदवार मदन भोसले हे सुद्धा मला मोठ्या भावाप्रमाणे आहेत मागच्या निवडणुकीत मी देवेंद्र फडणवीस यांचा ऐकून माझा अर्ज काढला होता आता यावेळी त्यांनी माझा विचार करावा. विचारधारा बदलणारा मी नाही परंतु खंडाळा तालुक्याचे विकासासाठी जे काय करायला लागेल ते मी करेन या आमदारांना मला पाडायचे असेल तर मी सर्वांची मदत घेऊन रणांगणात उतरणार आहे," असा इशाराही पुरुषोत्तम जाधव यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

SCROLL FOR NEXT