Crime Saam Tv News
महाराष्ट्र

Crime News: शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षांची गुंडगिरी, पोलीस पाटलांवर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला

Shinde Group Leader Attack Violence News: शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत पोलीस पाटलांवर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

Bhagyashree Kamble

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत पोलीस पाटलांवर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना वणीच्या खडकडोह येथील बस स्टॉपवर घडलीय. या प्रकरणी आरोपी विरोधात विविध कलामांनुसार, मुकुटबल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तक्रारीनुसार, पंढरी अरूण डुकरे (वय वर्ष ३५) असे पोलीस पाटील यांचे नाव आहे. सोमवारी ते भावाच्या शेतात मजुरासाठी डब्बा पोचवण्यास जात होते. यादरम्यान,आरोपी मोरेश्वर परशुराम सरोदे हा खडकडोह येथील बस स्टॉपवर उभा होता. पंढरी यांना पाहून आरोपीनं अश्लील भाषेत शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. काहीवेळ त्यांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले. मात्र, पंढरी यांना विचारणा केली असता, मोरेश्वर यानं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

सायंकाळी पंढरी हा शेतातील मजुराला खडकडोह येथे सोडायला जात होते. यादरम्यान, आरोपी मोरेश्वर तेथेच बसून होता. त्यानं त्याच्या दुचाकीतून लोखंडी रॉड काढला आणि पंढरी यांच्या डोक्यावर वार केला. दुसरा वार त्यांच्या मानेवर बसला. पंढरी यांनी आरडाओरडा केला असता, आरोपी तेथून पळून गेला.

डोक्यावर रॉडचा जबर वार बसल्यानं मोठ्या प्रमाणावर रक्तप्रवाह सुरु झाला होता. त्या ठिकाणी पंढरी यांचा भाऊ आला, चारचाकीमधून त्यांनी पोलीस ठाणे गाठले. डोक्यातून रक्त निघत असल्यानं पोलिसांनी पंढरी यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तसेच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

पंढरी यांच्या भावानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी मोरेश्वर सरोदे विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT