eknath shinde and devendra fadnavis saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: मोदींच्या हस्ते उद्घाटनाआधीच शिंदे-फडणवीस अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; समृद्धी महामार्गावरुन करणार एकत्र प्रवास

Nagpur Latest News: ज्या पद्धतीने हा रस्ता आहे, एक समृद्धी एक्सप्रेस वेगवान रस्ता त्याच पद्धतीने आमचं सरकारचं काम सुद्धा काम करत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Latest News: नागपूर-मुंबई या बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 11 डिसेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महामार्गवर ट्रायल घेणार आहेत. नागपूर  (Nagpur) ते शिर्डीपर्यंत ते एकत्र प्रवास करणार आहेत. (Eknath Shinde Latest News)

या रस्त्यावर प्रवास करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, मला आनंद आहे की, महाराष्ट्रातल्या गेम चेंजर अशा या प्रोजेक्टवर आम्ही काम केलं आहे, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने पुणे-मुंबई रस्ता झाला त्याच पद्धतीने हा रस्ता सुद्धा नागपूर-मुंबई  (Mumbai) गेम चेंजर ठरेल आणि उद्योग धंद्यांना चालना मिळेल. (Maharashtra News)

हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या संपूर्ण भागाला समृद्धी (Hindu Hruduay Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) देणारा हा रस्ता आहे आणि या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिले आहे याचं समाधान आम्हाला आहे. ज्या पद्धतीने हा रस्ता आहे, एक समृद्धी एक्सप्रेस (Samruddhi Mahamarg) वेगवान रस्ता त्याच पद्धतीने आमचं सरकारचं काम सुद्धा काम करत आहे. अनेक निर्णय आम्ही वेगाने घेतले आहे. सर्वांना सोबत घेऊन आम्ही वेगाने काम करत आहोत. आज या रस्त्यावरून प्रवास करणार आहे आणि या महामार्गाची पाहणी करणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाचीही होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. काल कोकण मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान या वक्तव्यावरुन टीका सुरु झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कालच मी माझं वक्तव्य सुधारलं होतं असं देखील ते म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Soyabean Crop : सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत; पाने खाणारी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Sachin Tendulkar Net Worth: लंडनमध्ये घर अन् अलिशान कार; क्रिकेटर सचिन तेंडूलकरची संपत्ती किती?

Diabetes Care : डायबिटीजमध्ये गोड खाणे शक्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

OBC Reservation: मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकटवले, दोन दिवस मुंबईत बैठक |VIDEO

SCROLL FOR NEXT