shelarwadi youth will be bagadya for bagad yatra bavdhan saam tv
महाराष्ट्र

Bagad Yatra Bavdhan : बावधन बगाड यात्रेचा बगाड्या ठरला

Bavdhan Bagad Yatra: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा येत्या शनिवारी (ता. 30 मार्च) पार पडणार आहे.

ओंकार कदम

Satara :

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील प्रसिद्ध बगाड यात्रेचा यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी येथील विकास तानाजी नवले यांना मिळाला आहे. येत्या (शनिवारी ता. 30 मार्च) ही बगाड यात्रा असल्याची माहिती संयाेजकांनी दिली. (Maharashtra News)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा येत्या शनिवारी (ता. 30 मार्च) पार पडणार आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री १२ वाजता देवाला कौल लाऊन या यात्रेतील बगाड्या होण्याचा मान ठरविला जातो.

यावर्षी शेलारवाडी बावधन येथील विकास तानाजी नवले यांना हा मान मिळाला आहे. काळभैरवनाथ यांना नवस केला होता तो पूर्णत्वास गेल्यामुळे नवसपूर्ती करण्यासाठी यावर्षीचा मान नवले यांना मिळाला आहे. त्याबाबतची माहिती नवले यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. बावधन बगाड यात्रेला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून भाविक हजेरी लावत असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

SCROLL FOR NEXT