Chikhaldara Fog अरुण जोशी
महाराष्ट्र

विदर्भाचे काश्मिर चिखलदऱ्यात पडली धुक्याची चादर (पहा फोटो)

मागील पंधरा दिवसांपासून येथे येणाऱ्या पर्यटकांना धुके पाहायला मिळाले नाही. परंतु, आज पुन्हा चिखलदऱ्यामध्ये तब्बल पंधरा दिवसांनंतर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अरुण जोशी

अमरावती : विदर्भाचा काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात पावसाळ्यामध्ये धुक्याची चादर ही पडतच असते. परंतु मागील पंधरा ते वीस दिवसांपासून राज्यभरात पावसाने दडी मारली होती त्यातच चिखलदाऱ्यामध्ये पाऊस गायब झाला होता.

हे देखील पहा -

त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून येथे येणाऱ्या पर्यटकांना धुके पाहायला मिळाले नाही. परंतु, आज पुन्हा चिखलदऱ्यामध्ये तब्बल पंधरा दिवसांनंतर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मागील महिनाभरात पडलेल्या दमदार पावसामुळे सध्या चिखलदरामधील सर्व धबधबे हे प्रवाहित झाले आहेत. सगळीकडे जमिनीने हिरवाईचा जणू काही शालूचं पांघरला आहे. त्यामुळे आता चिखलदरामध्ये पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा निसर्गप्रेमींची आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे. चिखलदऱ्यातील देवी, पॉइंट भीमकुंड पॉइंट सह विविध ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT