गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड
लोकसभेच्या शिरूर मतदारसंघात तगडा उमेदवार देऊन निवडून आणणारच, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगताच अजित पवार गटातील इच्छुक उमेदवारांमध्ये बळ आलं आहे. त्यांनी लगेच अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध दंड थोपटले असून, आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. खासदारांनी त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले होते. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केले होते, असं अजित पवार (Amol Kolhe News) म्हणाले होते. त्यानंतर शिरूरमधून (Shirur Lok Sabha constituency) तगडा उमेदवार देऊन निवडून आणणारच, असा निर्धार आता अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी कोल्हेंवर (Dr. Amol Kolhe News) निशाणा साधून तेथील स्थानिक नेत्यांना एकप्रकारे बळ दिल्याचं बोललं जात आहे. तर इच्छुक उमेदवारांनीही कोल्हेंविरुद्ध दंड थोपटले आहेत. यावेळी मी देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी केले आहे.
लांडे यांनी २००९ मध्येही निवडणूक लढवली होती...
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Loksabha) प्रतिनिधीत्व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे करतात. यावेळी लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून आपल्या पक्षाचा उमेदवार देऊ, असं अजित पवार यांनी स्वतः सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी सन २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर २०१९ मध्येही मी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होतो. यावेळच्या निवडणुकीतही मी लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे, असे विलास लांडे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.