NCP SHARAD PAWAR  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राजीनामा; 'या' पक्षात केला प्रवेश

Sharad Pawar NCP latest news : अकोल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. अकोटचे शहराध्यक्ष संदेश घनबहाद्दूर आणि बारी समाजाचे नेते डॉ. श्याम नेमाळे यांनी समर्थकांसह प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi : अकोल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. शरद पवार गटातील अकोटचे शहराध्यक्ष आणि बारी समाजाच्या नेत्यांनी वंचितमध्ये पक्षप्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. राज्याच्या राजकारणात 'वंचित बहुजन आघाडी'चे नेते प्रकाश आंबेडकरांच्या 'सोशल इंजिनिअरिंग'ची चांगलीच चर्चा होत असतेय.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आता राज्यातील बारी समाजाला वंचितच्या चळवळीत अधिक जोमाने सामावून घेण्यासाठी पुढाकार घेतलाय. याचाच भाग म्हणून आज राज्यातील बारी समाजातील मोठा चेहरा असलेल्या डॉ. श्याम नेमाळे आणि अकोटच्या शरद पवार गटातील शहराध्यक्ष संदेश घनबहाद्दूर यांचा वंचितमध्ये पक्षप्रवेश झालाय. आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह अकोल्यात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय. यासह ओबीसी व मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश पार पडला.

यांनी केला पक्षप्रवेश :

संदेश घनबहादुर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोट शहराध्यक्ष आहे. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, गजानन गवई यांच्या नेतृत्वात अकोट शहरात आयोजित वंचितच्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश घेतलाय. डॉ. श्याम नेमाळे हे बारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आहे. त्यांनी देखील वंचितचा झेंडा हाती घेतलाये.

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला अकोट शरद धक्का वंचितने दिला आहे. यावेळी इतर ओबीसी व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते देखील वंचित पक्षात सहभागी झाले. यावेळी डॉ. श्याम नेमाळे आणि समाजातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बारी समाजाच्या प्रश्नावर सविस्तर आणि सखोल चर्चा केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Mumbai Pollution: मुंबईतील प्रदूषणाला MMRDA चे प्रकल्प जबाबदार? उच्च न्यायालयाच्या समितीने व्यक्त केली नाराजी, तातडीने कारवाईचे आदेश

Metro 5 : ठाणे, भिवंडी आणि कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो ५ च्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

MSEDCL Smart Meter : स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद; महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम

High Cholesterol: शरीरात साचलेलं कोलेस्ट्रॉल झटक्यात निघेल बाहेर; फक्त दररोज सकाळी चावून खा हे 1 पाच रूपयांचं हिरवं पान

SCROLL FOR NEXT