Sharad Pawar Faces Major Setback  Saam TV News
महाराष्ट्र

Ajit Pawar : शरद पवारांना अजित पवारांचा मोठा हादरा, निष्ठावंत शिलेदार घड्याळ बांधणार

Sharad Pawar Setback : हिंगोलीतील स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा धक्का, निष्ठावंत अनिल पतंगे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. शेकडो कार्यकर्ते सोबत असणार.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar Faces Major Setback : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना हिंगोलीमध्ये मोठा हादरा बसला आहे. निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले अनिल पतंगे (NCP anil patange) यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल पतंगे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल पतंगे यांचे हिंगोली जिल्ह्यात वजन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंत नेत्याने साथ सोडल्यामुळे हिंगोलीमध्ये शरद पवार यांच्या तुतारीची वाट बिकट झाल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पतंगे ८ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी अजित पवार ८ जून रोजी हिंगोलीच्या दौऱ्यावर येत आहे. अनिल पतंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत घड्याळ हातात बांधणार आहेत. सेनगाव येथे ८ जून रोजी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनिल पतंगे यांच्यासह सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. हा शरद पवार यांना सर्वात मोठा हादरा मानला जातोय.

रविवारी होणाऱ्या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पालकमंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही स्थानिक नेते उपस्थित राहणार आहे. दरम्यान, आमदार राजू नवघरे यांना प्रतिसाद देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. शरद पवार यांच्यावर आमची नाराजी नाही. निष्ठावंत म्हटल्यावर नाराजी व्यक्त करणे चुकीचं आहे. पण कार्यकर्त्यांचा आग्रहामुळे आम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत, अशी प्रतिक्रिया अनिल पतंगे यांनी दिली आहे. सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही ८ तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचेही पतंगे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT