Sharad Pawar Speech Saam Digital
महाराष्ट्र

Sharad Pawar Speech : इथून पुढे मातीची कुस्ती कमी होईल, मॅटवरचा सराव हवा; शरद पवारांचा राज्यातील कुस्तीपटुंना सल्ला

Sharad Pawar Speech Pune : येणाऱ्या काळात मातीची कुस्ती कमी होईल, आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून चांगलं प्रदर्शन करायचं असेल तर मॅटच्या कुस्तीचा सराव आपल्याला करावा, असं मार्गदर्शन शरद पवार यांनी आज पुण्यातील कुस्ती मेळाव्यात केलं.

Sandeep Gawade

कोल्हापूर कुस्तीचं माहेर घर झालं, त्यानंतर कुस्तीत पुण्याचंही नावं झालं. संपूर्ण महाराष्ट्रात कुस्ती नावारूपास आली आणि आज महाराष्ट्रात कुस्तीला वेगळं स्थान आहे. देशाचं नाव आज अनेक कुस्तीगिरांनी गाजवलं आहे. मात्र येणाऱ्या काळात मातीची कुस्ती कमी होईल, आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून चांगलं प्रदर्शन करायचं असेल तर मॅटच्या कुस्तीचा सराव आपल्याला करावा, असं मार्गदर्शन शरद पवार यांनी आज पुण्यातील कुस्ती मेळाव्यात केलं. कुस्तीत दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल राज्यातील कुस्तीपटुचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

एका शेतकऱ्याचा मुलाला हरवण्यासाठी स्वतः मोदी येत आहेत - चंद्रहार पाटील

कितीही अडचण आली तर इथं यायच होत,कुस्तीगीर म्हणून इथ येणं महत्वाचं आहे. शरद पवारांनी सांगली लोकसभेचा आढावा घेतला. आज माविआचे सर्व नेते एकत्र आले होते. विशाल पाटील भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत. आज सगळ्या गोष्टी क्लिअर झालेलं आहे. उद्या विश्वजित कदम यांच्या पलूस मधे प्रचाराचा शुभारंभ करत आहेत. एका शेतकऱ्याचा मुलाला हरवण्यासाठी स्वतः मोदी येत आहेत याचा अभिमान आहे मला. मला विशाल पाटील किंवा संजय काका पाटील यांचं अजिबात आव्हान वाटत नाही.

राहुल गांधी याची रॅली आणि शरद पवार याच्या सभा याच नियोजन सुरू आहे. मी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्वांच्या समोर उभा आहे. आज माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे अशा वावड्या उठवल्या जातात. आमच्यावर गुन्हे दाखल आहे होत आहेत होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT