Ranjitsinh Nimbalkar On Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'शरद पवारांनी माझा विरोधात निवडणूक लढवावी', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर निंबाळकर यांचं थेट आव्हान

Ranjitsinh Nimbalkar On Sharad Pawar: 'शरद पवारांनी माझा विरोधात निवडणूक लढवावी', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर निंबाळकर यांचं थेट आव्हान

भरत नागणे

Ranjitsinh Nimbalkar On Sharad Pawar:

माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यावर माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी निशाणा साधला आहे. माझा विरोधात शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर आज पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार निंबाळकर यांनी थेट पवारांनाच डिवचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रविवारी खासदार सुप्रिया सुळे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी सुळे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे मतदार संघात कमी आणि दिल्लीत जास्त दिसतात, अशी टिका केली होती. त्यावर बोलताना खासदार निंबाळकर यांनी थेट पवार कुटुंबीयांनाचा आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)

खासदार निंबाळकर म्हणाले, शरद पवार माढ्याचे खासदार असताना जेवढे काम केले नाही, तेवढे काम मी गेल्या चार वर्षांत केले आहेत. माझा मतदार संघातील लोकांशी सातत्याने संपर्क आहे. कोट्यावधी रूपयांची विकास कामे केली आहेत. नीरा भाटघर, देवधरचे पाणी मतदार संघातील माळशिरस,सांगोला या भागाला मिळवून दिले आहे. दुष्काळी भागाला पाणी दिले आहे. त्यामुळे मतदार संघातील लोकांचा माझ्या कामावर विश्वास आहे. मला निवडणूकीची चिंता नाही. उलट माझ्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार किंवा खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवावी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असे थेट आव्हान देत पुन्हा आपण माढ्यातून निवडणूकीसाठी सज्ज असल्याचे ही त्यांनी जाहीर केले.

माढ्यातून शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. अमित शहाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नॅनो केला आहे अशी टिकाही त्यांनी केली.

प्रत्येकाला पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. कोणी उमेदवारी मागत असेल तर त्याला आपला विरोध नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. गेल्या चार वर्षांत लोकांची कामे केली आहेत. त्यामुळे पक्ष पुन्हा उमेदवारी देईल, असा विश्वास ही खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केला. उमेदवारी वरून अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या बरोबर कोणतेही मतभेद नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT