Sharad PAwar-raosaheb danve Saam TV
महाराष्ट्र

Video : शरद पवार-रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीत प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बीडच्या गेवराई शहरात माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात दोन्ही एकत्र आले होते.

विनोद जिरे

बीड : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. एकीकडे शिवसेनेच्या पक्षचिन्हावरुन शिंदे-ठाकरे गटात बैठकांवर बैठका सुरु असताना एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

शरद पवार आणि रावसाहेब दानवे एकाच गाडीत दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं. बीडच्या गेवराई शहरात माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, धनंजय मुंडे, सुरेश धस, यांची प्रमुख उपस्थिती होती.

चिन्हाचा काही फरक पडत नाही- शरद पवार

शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर शरद पवार यांनी म्हटलं की, असं काही होईल याची मला खात्री होती, असं माझं मन सांगत होतं. योग्य निर्णय दिले जातील याची खात्री नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

तर आपण देखील अनेकवेळा अनेक चिन्हांवरती निवडणुका लढविल्या आहेत. चिन्हाचा काही फरक पडत नाही, शेवटी जनता सर्व काही ठरवते असंही ते म्हणाले. तसंच या सर्व परिस्थित आता शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असंही पवार म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिनिक्स मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न

Jalgaon Rain : जळगावमध्ये मुसळधार पाऊस, बहुळा धरणाचा रुद्र अवतार | VIDEO

Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Mumbai Pune : मुंबई-पुणे महामार्गावर भयंकर अपघात, २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT