MP Bajarang Sonawane Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident: मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

MP Bajarang Sonawane Car Accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाला. दुचाकीने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला.

Priya More

Summary:

  • बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात

  • भरधाव दुचाकीने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली

  • या अपघातामध्ये एक जण जखमी झाला आहे

  • बीडच्या केजमध्ये ही घटना घडली

योगेश काशिद, बीड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. खासदार सोनवणे यांच्या कारला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कारला एका दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बजरंग सोनवणे यांच्या कारचे नुकसान झाले. त्यांच्या कारच्या काचा फुटल्या. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. खासदार बजरंग सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता. त्यावेळी ही अपघाताची घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावर जमाव जमला होता. या अपघातात बजरंग सोनवणे यांना काही झाले नाही पण त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

SCROLL FOR NEXT