विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकांचे निकाल अखेर 45 तासांच्या दीर्घ मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. 5 पैकी 3 जागांवर मविआनं वर्चस्व प्रस्थापित केलं असलं तरी या निकालांमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगतेय ती शरद पवारांच्या पक्षाच्या 'स्ट्राईक रेट'ची... शरद पवारांच्या पक्षानं 100 टक्के स्ट्राईक रेट नोंदवत पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे, तर भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट अवघ्या 33 टक्क्यांवर येऊन ठेपलाय... विधानपरिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाचा स्ट्राईक रेट किती आहे...पाहूयात...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मराठवाडा पदवीधर आणि पुणे पदवीधरच्या 2 जागांवर निवडणुक लढवली...आणि 2 जागांवर विजय मिळवल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 100 टक्क्यांवर पाहायला मिळालाय... काँग्रेसनंही नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षकच्या दोन जागांवर उमेदवार उभे केले.मात्र नागपूर पदवीधरच्या एकाच जागेवर काँग्रेसचा विजय मिळालाय...त्यामुळे काँग्रेसचा स्ट्राईक रेट 50 टक्क्यांवर पोहचलाय...
दुसरीकडे शिंदेसेनेनं पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या 2 जागा लढवल्या त्यातील अमरावीत शिक्षकच्या एका जागेवर विजय झाला तर एका जागेवर शिंदेसेनेला पराभव पत्करावा लागल्यानं शिंदेसेनेच्या विजयाचा स्ट्राईक रेट 50 टक्के पाहयाला मिळालाय.. तर पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधरच्या जागेवर निवडून लढवूनही भाजपला पुणे शिक्षकांच्या जागेवरच विजय मिळवता आलाय.... त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट थेट 33 टक्क्यांवर पोहचलाय...
मात्र विजयाच्या स्ट्राईक रेटमध्ये शरद पवारांच्या पक्षानं मारलेली बाजी पाहता...86 वर्षांच्या पैलवानानं भल्याभल्याना धूळ चारल्याची चर्चा जास्त रंगलीय..आहे...त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात 86 वर्षांचे शरद पवारचं चाणक्य असल्याचं सिद्ध झालयं...
मुळात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाच्या राजकीय अस्तित्वावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. तळागाळात्या कार्यकर्त्यांशी नाळ कायम ठेवत आणि योग्य रणनीती आखत 86 वर्षांच्या पवारांनी लोकसभेत 8 तर विधानसभेत 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता... त्यातच आता पुणे पदवीधर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरमध्ये शरद पवारांच्या पक्षानं केलेल्या कामगिरीमुळे महायुतीचे धाबे चांगलेच दणाणलेत एवढं निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.