Sharad Pawar on Bjp Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar Press Conference : राजीनामा मागे घेताना शरद पवार यांचा थेट भाजप नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले...

Sharad Pawar on BJP : राजीनामा मागे घेताना शरद पवार यांचा थेट भाजप नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले...

Satish Kengar

Sharad Pawar on BJP : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी शरद पवार हे होते. त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकांनाही धक्का बसला होता.

दोन दिवसांच्या घडामोडी अखेर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. मुंबई येथील यशवंत चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली.

राजीनामा मागे घेताना शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेतृत्वाला इशारा दिला आहे. ''लोकांना पर्याय देण्याची आवश्यकता आहे', असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेतृत्वाला इशारा दिला आहे. (Breaking Marathi News)

शरद पवार यांच्या निर्णयाचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार का? असा प्रश्न पवार यांना पत्रकारांनी विचारला. यावर ते म्हणाले आहेत की, ''महाविकास आघाडी आम्ही लोकांना एक पर्याय मिळावा म्हणून केली आहे. माझ्या निर्णयाचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही.''

ते पुढे म्हणाले, ''आम्ही सगळे (मविआ) एकत्र काम करत आहोत. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही लोकांच्या हिताचं काम करू आणि लोकांना पर्याय देण्याची आवश्यकता आहे. त्याची पुरतात करण्यासाठी आम्ही मेहनत करू. ''

Sharad Pawar Press Conference: राजीनामा मागे घेताना काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती' असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘'मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे' या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी?

Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होणार; धन योगाला उत्तम दिवस; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

Maharashtra Live News Update: हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या अजिंक्य कडला उरळी कांचन पोलिसांनी घेतलं ताब्यात

SBI प्रकरणात अंबानींना मोठा धक्का! मुंबई उच्च न्यायालयाने दिला दणका; नेमकं प्रकरण काय? वाचा

Manoj Jarange: रक्ताने हात माखलेल्यांनी बोलू नये, धनंजय मुंडेंना जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT