Solapur NCP Abhijit Patil News
Solapur NCP Abhijit Patil News  Saam TV
महाराष्ट्र

Breaking News: शरद पवारांच्या कट्टर समर्थकांसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल; साडेचारशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

भरत नागणे

Solapur NCP Abhijit Patil News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरातील खंदे समर्थक अभिजित पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होताच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिजीत पाटील हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे कट्टर समर्थन म्हणून ओळखले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडून आले होते.

सध्या अभिजित पाटील पंढरपूरजवळच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या कारखान्यातील पूर्वीच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतले होते. या कर्जाची रक्कम तब्बल साडेचारशे कोटींहून अधिक आहे. बँकेने वेळोवेळी नोटीस देऊन सुद्धा संचालक मंडळाने कर्जाची परतफेड केली नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे राज्य सहकारी बँकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. बँकेच्या तक्रारीनुसार पंढरपूर शहर पोलिसांनी अभिजित पाटील यांच्यासह २० संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होताच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजकीय द्वेषा पोटी माझ्यावर आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT