Ajit Pawar & Jayant Patil saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत साखरपेरणी? अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये काय गुप्तगू झाली? VIDEO

jayant patil meets ajit pawar : महाविकास आघाडीत नाराज असलेल्या जयंत पाटलांनी अजित पवारांची भेट घेतली.. या भेटीत नेमकं काय घडलं? दादांनी जयंत पाटलांसाठी साखरपेरणी केलीय का? जयंत पाटील पवारांची साथ सोडणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Bharat Mohalkar

व्हिडीओ पाहा.... वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या केबिनमध्ये अजित पवार बसलेले दिसत आहेत.. दरम्यान जयंत पाटलांची एण्ट्री झाली आणि केबिनमधील उपस्थितांना बाहेर काढण्यात आलं.. त्यानंतर तब्बल अर्धा तास जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये गुप्तगू झालं... त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलंय.. त्यावरुन संजय राऊतांनी मात्र खोचक टोला लगावलाय...

दोघांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. 'त्यांच्याकडे भेटीसाठी संस्था, आम्ही मात्र फाटके, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. तर सुप्रिया सुळेंनी मात्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील भेट राजकीय नसल्याचं म्हटलंय. तर वडेट्टीवारांनी मात्र राऊतांनाच टोला लगावलाय. हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

आम्ही एकमेकांचे दुश्मन आहोत का? असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर अजित पवारांनी तातडीने माध्यमांसमोर आले आणि त्यांनी भेटीमागचं कारण सांगितलं. अजित पवारांनी ही भेट एआय संदर्भात असल्याचं म्हटलं असलं तरी महाविकास आघाडीत जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा गेली कित्येक दिवसांपासून रंगलीय..त्यातच जयंत पाटलांची भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढत चाललीय. तर पाटलांनीही याआधीच सूचक संकेत दिलाय..

हे असं असलं तरी अजित पवारांसोबतची भेट ही खरंच एआय संदर्भात होती का? अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जयंत पाटलांसाठी साखर पेरणी करत आहेत का? विधानसभेला फटका बसल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या एकीकरणासाठी प्रयत्न करत आहेत की जयंत पाटीलच पवारांची साथ सोडून दादांच्या तंबूत जाणार का? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

SCROLL FOR NEXT