Sharad Pawar  saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar on Maratha Aarakshan : सुप्रीम कोर्टात काय होईल सांगता येत नाही; मराठा आरक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar News :शिंदे सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'सुप्रीम कोर्टात काय होईल सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

संभाजी थोरात

Sharad Pawar in Satara :

शिंदे सरकारने मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे. आज मंगळवारी विधानभवनातील विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'सुप्रीम कोर्टात काय होईल सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांची कालच्या कार्यक्रमात शाहू महाराज छत्रपतींची भेट झाली नाही. यामुळे शरद पवारांनी शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, 'शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मला एकट्याला नाही. महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेणार आहे. मला आनंदच होईल, ते असले तर मात्र शाहू छत्रपती हे सामाजिक कामात जास्त असतात. त्यांच्या उमेदवारीबाबत कोल्हापूरमध्ये जर मागणी असेल तर मला आनंदच होईल'.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाष्य करताना शरद पवार काय म्हणाले?

'महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या 39 जागावाटपांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबतं सुरू आहेत. मी, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे. मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी खोचक टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT