dhule muncipal corporation saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Faction : धुळ्यात अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव : राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची पाेलीसांत तक्रार

सूत्रधाराचा तपास पाेलीसांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

भूषण अहिरे

Dhule News : धुळे महापालिका शहरात जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्यासाठी व केवळ विशिष्ट लाेकांचे अतिक्रमण हटविण्यासाठीच अतिक्रमण माेहिम राबवत असल्याचा आराेप राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने (NCP Dhule) केला आहे. यामुळे धुळे शहरात सध्या महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज (बुधवार) पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. पदाधिका-यांनी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्याकडे पालिका प्रशासनातर्फे सुरू असलेली मनमानी अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबविण्याची मागणी केली. यावेळी एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी काही ठराविक सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून मनपा प्रशासनातर्फे ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर मर्जीतील दुकानदारांची अतिक्रमणे यामध्ये हटविली जात नसल्याचा देखील आरोप करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या संदर्भात पोलीस प्रशासनातर्फे चौकशी करून यामागील सूत्रधार कोण याचा तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मोबाईल मार्केटला झटका! युद्धामुळे 25 हजार कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT