Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'महाराष्ट्राचं भाग्य आहे की...'; मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून शरद पवारांचा टोला

Vishal Gangurde

Sharad Pawar News: वृत्तपत्रातील मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. अशातच आता शरद पवारांनी देखील या जाहिरातीवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर देखील शरद पवारांनी भाष्य केलं. 'आम्हालाही हे आत्ताच कळलं की महाराष्ट्राचं भाग्य आहे की, अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज होता की, हे सरकार भाजपमुळे बनलं आहे, या सरकारमध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे, असे शरद पवार म्हणाले.

'मुख्यमंत्र्याच्या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली आहे की, सरकारमध्ये भाजपचं योगदान जास्त नाही. ते अन्य घटकांचं आहे. महाराष्ट्राला कळवण्याचा ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद', असेही शरद पवार पुढे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीरवरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून शिवसेनेने पुन्हा जाहिरात देऊन खुलासा देखील केला. यावरून देखील शरद पवारांनी निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, 'एवढ्या मोठ्या जाहिराती सर्व वृत्तपत्रांना दिल्या. प्रिंट मीडियाच्या दृष्टीकोनातून ही लाभदायक गोष्ट ठरली आहे'.

शेतकरी उद्ध्वस्त होत आहे - शरद पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे. 'विदर्भ मराठवाडा आणि खान्देश या ठिकाणी 50 टक्के कापूस घरात आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित किंमत मिळत नाहीये. सोयाबीनन व इतर पिकाबाबतीत आहे. उत्पन्न दुपट्ट करावे असे म्हणणारे सरकार अपयशी ठरले आहे, असे शरद पवार म्हणाले.

'दोन एजन्सी नाफेड आणि कॉटन फेडरेशन यांना खरेदी करायला सांगितले पाहिजे. आता शेतीसाठी लागणारी पैसे कापसातून येणार होते, पण सध्या याबाबतीत शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत, असेही शरद पवार म्हणाले.

'संपूर्ण देशात परिवर्तनाचे वातावरण आहे. लोकांना हल्लीच्या राजकारणात सत्ता देऊ नये असे वाटते. देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा कुठे भाजप आहे हे कळेल.केंद्र सरकारने उत्पन्न दुप्पट करणार असे सांगितले होते. त्यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT