Sharad Pawar Group Saam Tv
महाराष्ट्र

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

शरद पवार यांनी दावा केला की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी भेट घेऊन १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दावा हास्यास्पद म्हटला आणि त्या दोन व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांवर टीका केली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन व्यक्तींनी भेटून २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. पवार यांनी सांगितले की, या दोघांनी त्यांना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ही ऑफर दिली होती. मात्र, निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. राहुल गांधी यांनी नुकत्याच मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर पवार यांनी हा दावा केला आहे. या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांचा दावा हास्यास्पद ठरवत त्या दोन व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही पवारांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवार इतक्या दिवस शांत का होते? असा सवाल उपस्थित केला आहे. इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय. निवडणूक आयोगाने बोलवल्यास कुणीही समोर जात नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Live News Update: नाशिकला २ दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट, गणपती विसर्जनावर पावसाचं सावट

GST Council: दिवाळीआधीच धमाका! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी

Tilgul Modak Recipe : सुबक कळीदार तिळगुळाचे मोदक, नैवेद्य खाऊन गणपती होईल खुश

Nagpur Explosion : मध्यरात्री नागपूरमध्ये RDX प्लांटमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू, १७ जण जखमी, सहा जण ICU मध्ये

SCROLL FOR NEXT