निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले – शरद पवार  Saam Tv
महाराष्ट्र

निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले – शरद पवार

पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केलेहे सरकारला उशिरा सुचलेला शहाणपण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर - केंद्र सरकारच्या वतीने आज वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास एक वर्षे सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलना समोर मोदी सरकारला झुकावे लागले. आज सकाळी देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. याबाबत आता चंद्रपूरमधून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रया दिली आहे. 

हे देखील पहा -

शरद पवार म्हणले की, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केलेहे सरकारला उशिरा सुचलेला शहाणपण आहे. संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो असे देखील पवार यावेळी म्हणले आहे.

पुढे ते म्हणले की, मी दहा वर्षे कृषीमंत्री असताना संसदेत विरोधकांनी कृषी कायद्यांमध्ये बदल घडवण्याची मागणी केली होती. गुंतवणूकीला वाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजार पेठ मिळावी, अशा काही उद्देशाने मी कृषीमंत्री असताना कायद्यात बदल करावेत का, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र, आपल्या घटनेने कृषी हा विषय राज्याकडे दिलाय त्यामुळे राज्याशी चर्चा करुन, कृषी संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायाचा असं ठरवलं होतं. मात्र, कृषी संबंधीत कायदे करायचे असल्यास त्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित होती, पण सत्ताधाऱ्यांनी होऊ दिली नाही. या कृषी कायद्यामुळे शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Maharashtra Live News Update : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT