Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha Latest News Saam TV
महाराष्ट्र

Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांनी मतदानापूर्वी EMV मशीनला घातला फुलांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha Latest News : सोमवारी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शांतीगिरी महाराज नाशिक येथील मतदान केंद्रावर पोहचले होते. मात्र, यावेळी त्यांनी मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनला हार घातल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांसाठी आज महाराष्ट्रात मतदान आज होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी अनेकजण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत आहेत. नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

सोमवारी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शांतीगिरी महाराज नाशिक येथील मतदान केंद्रावर पोहचले होते. मात्र, यावेळी त्यांनी मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनला हार घातल्याने चर्चेला उधाण आलं आहे. शांतिगिरी महाराजांचा मतदान केंद्रावरील व्हिडीओ समोर आला आहे.

यासंदर्भात जर तक्रार दाखल झाली तर शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. यावरून चाकणकर यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे आता शांतिगीरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराज यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की विजय आमचाच होणार. यंदाची निवडणूक आम्हाला जिंकायचीच आहे, मतदार बादली चिन्हाला भरभरून मतदान करणार, असा विश्वास शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

ईव्हीएम मशीनला हार का घातला? असा प्रश्न पत्रकारांनी शांतीगिरी महाराजांना विचारला. यावर उत्तर देताना, मतदान पवित्र आहे. या यंत्राजवळ येऊन मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे सर्वांना सद्बुद्धी व्हावी. आपलं मत भारत मातेच्या कामात यावा, म्हणून पवित्र हार आम्ही इव्हीएम मशिनला घातला, असं शांतिगिरी महाराजांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत ४ वर्षीय हरवलेली मुलगी सुरक्षित आईकडे परत

Operation Akhal : रक्षाबंधनाच्या दिवशी २ जवान शहीद; ऐन सणासुदीत सैन्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मोठी बातमी! जुन्या मंदिराची भिंत कोसळली; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जण एकाच कुटुंबातले

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळ्याची आठवणही नाही राहणार, कोल्हापूरजवळचं 'हे' निसर्गरम्य ठिकाण देईल खरी मजा

Latur News : त्रास मुतखड्याचा उपचार किडनीचा; डॉक्टरांनी परस्पर किडनीच काढली रुग्णाचा दावा

SCROLL FOR NEXT