shambhuraj desai vinod (balasaheb) khandare
shambhuraj desai vinod (balasaheb) khandare 
महाराष्ट्र

महिना झाला १ गुंड सापडेना; गृहराज्‍यमंत्री पाेलिसांवर नाराज

ओंकार कदम

सातारा : सहा सहा वर्ष एका पाेलिस ठाण्यात कर्मचारी ठेवण्याचे कारण काय? महिना झाला गुन्हा दाखल हाेऊन तरी तुम्हांला गुंड सापडत नाही. काय काम करता तुम्ही आणि तुमचे कर्मचारी असा प्रश्न गृहराज्‍यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी उपस्थित करुन नगरसेवक विनाेद (बाळू) खंदारे याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने तुमच्यावर कारवाई करु असा जणू इशाराच दिला आहे. shambhuraj-desai-balasaheb-khandare-udayanraje-bhosale-satara-news-police-sml80

खासदार उदयनराजे भाेसले यांनी काही दिवसांपुर्वी सातारा पाेलिस आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. नगरसेवक विनाेद (बाळू) खंदारे याच्यावर दाखल असलेले गुन्हे, पाेलिस प्रशासन राजकीय दबावापाेटी करीत असलेले कामकाज या विषयी उदयनराजेंनी पत्रकार परिषदेतून पाेलिस दलाच्या कामकाजाविषयी शंका व्यक्त केली हाेती. दरम्यान राज्याचे गृहराज्‍यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बहुधा उदयनराजेंनी मांडलेल्या शंकेची शहनिशा करण्यासाठी आज पाेलिस ठाणे गाठले.

आज (साेमवार) सकाळी अचनाक गृहराज्‍यमंत्री देसाई दुचाकीवरुन सातारा शहर पोलिस ठाण्यात गेले. तेथे जाताच तेथील वातावरण पाहून देसाई यांनी शिस्त आणि कामकाजाविषयी नाराजी व्‍यक्‍त केली. दरम्यान मंत्री देसाई यांनी नगरसेवक विनाेद उर्फ बाळू खंदारे याच्‍यावर दाखल असलेल्या गुन्‍ह्‍यांची माहिती मागितली असता नियुक्त कर्मचा-यास व्यवस्थित सांगता न आल्याने देसाईंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

देसाई म्हणाले खंदारेवर गुन्हा दाखल असल्याचे माहिती नाही. एका पाेलिस ठाण्यात सहा वर्ष राहून देखील रेकाॅर्डवरील गुन्हेगाराची माहिती देऊ शकत नाही कर्मचारी. अधिकारी सांगतात १८ गुन्हे पाेलिस कर्मचारी सांगतात १२ गुन्हे, सहा गुन्हे लपविण्याचे कारण काय असे देसाई यांनी म्हणताच अधिकारी यांनी संबंधित विषय सावरुन घेत ते सहा गुन्हे प्रतिबंधात्मक विषयाचे असल्याचे सांगितले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

SCROLL FOR NEXT