shambhuraj desai 
महाराष्ट्र

आयकर छापेमारी : त्यांचं वागणं संशय घेण्यासारखे; शंभूराज देसाई

ओंकार कदम

सातारा : आज आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे मारले. त्यामुळे राज्यभरात काही काळ राजकीय क्षेत्रात या विषयाची चर्चा सुरु झाली. दरम्यान गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आयकर विभाग संबंधितांची चाैकशी करेल आणि आपल्या समाेर लवकरच याेग्य माहिती पुढं येईल असे नमूद करीत एका राजकीय पक्षाच्या माजी खासदाराने येणे आणि त्यानंतर छापेमारी हाेणे हे संशय घेण्यासारखीच गाेष्ट आहे असे नमूद केले. shambhuraj-desai-ajit-pawar-income-tax-raid-jarendeshwar-sugar-factory-kirit-somaiya-sml80

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले जाणिवपुर्वक भाजपचा एक माजी खासदार येतात आणि २ दिवसातच आयकर विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येतात याचा अर्थ यामध्ये संशय घेण्यासारखी जागा आहे. जाणिवपुर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने काही बाबी सांगितल्या तर आयकर विभागाचे अधिकारी कसे लगेच येतात. हे अधिकारी आत्ता पर्यंत कसे आले नाहीत असा प्रश्न गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले जे काेणी कारखानदार आहेत. ते सर्वजण निश्चितपणे या चाैकशांना सामाेरे जाण्याची त्यांची तयारी असते. कारण कर नाही तर डर कशाला. ज्यांनी चांगले कारभार केले आहेत. स्वच्छ कारभार केले आहेत त्यांच्याकडून काही निष्पन्न झालेले नाही. यापुर्वी देखील आपण पाहिले आहे. किती तरी तपासण्या झाल्या. सत्ताधारी यंत्रणेचा वापर करीत असतील. परंतु नाहक काही नसताना अशा पद्धतीने तक्रार झाली अथवा काेणती तरी स्टंट केला तर लगेच आयकर सारखा माेठा विभाग सज्ज हाेताे हे कसं काय.

आयकर विभाग संबंधितांची चाैकशी करेल आणि आपल्या समाेर लवकरच याेग्य माहिती पुढं येईल. एका राजकीय पक्षाच्या माजी खासदाराने येणे आणि त्यानंतर छापेमारी हाेणे हे संशय घेण्यासारखीच गाेष्ट आहे असे देसाईंनी नमूद केले.

दरम्यान राज्य शासनाने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली केली आहेत. नागरिकांनी धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेट देत असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच भेट द्यावी असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

श्री. देसाई यांनी दत्त मंदिर, पंचमुखी गणेश मंदिर व साईबाबा मंदिरात भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी केली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कोरोना संसर्गाच्या पार्श्वभमीवर शासनाने राज्यातील धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. आज घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे उघण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेटी देत असताना नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवावी व शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असेही आवाहनही श्री. देसाई यांनी केले

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT