Shaktipeeth Expressway Jagran
महाराष्ट्र

शक्तीपीठ महामार्ग: मॅपिंगसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांनी रोखलं; २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात, अनेक आंदोलक ताब्यात

Shaktipeeth Highway Protest: कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला शेतकऱ्यांनी विरोध केला. शेळोली गावात प्रशासनाचा प्रयत्न रोखण्यात आला असून २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Namdeo Kumbhar

रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी

Shaktipeeth Expressway Row: शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून भुदरगड तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झालेत. शेळोली गावात मॅपिंग करण्यासाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांनी विरोध करत मॅपिंगचा प्रयत्न हाणून पाडलाय. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तब्बल २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मात्र, कोणत्याही परिस्थितीत महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीनं दिलाय. दरम्यान, उद्या म्हणजेच २४ नोव्हेंबरला भुदरगड प्रांताधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. भुदरगड तालुक्यातील शेळोली, मडूर आणि करडवाडी या गावांतून प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. आज शेळोलीतील शिवलीकरवाडी परिसरात प्रशासनाकडून मॅपिंगचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, शेतकऱ्यांनी एकत्र येत हा प्रयत्न रोखला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी सुमारे २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डीवायएसपी विवेक पाटील, प्रांताधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भुदरगड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केलं.

कोणत्याही परिस्थितीत भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीचे समन्वयक कॉम्रेड सम्राट मोरे आणि मच्छिंद्र मोरे यांनी दिला आहे. दरम्यान, उद्या २४ नोव्हेंबरला भुदरगड प्रांताधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ८ दिवसांत नोव्हेंबर संपणार, लाडकी बहिणीला ऑक्टोबरचा १५०० चा हप्ता कधी मिळणार?

Water Test: सरकार ॲक्शन मोडमध्ये, सर्व ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याची चाचणी होणार; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: महालक्ष्मी रेसकोर्सवरील कॉन्सर्टमध्ये ड्रग्स सेवनाचा प्रकार उघड; १२ जणांची चाचणी पॉझिटिव्ह

Political News : भाजपची ताकद वाढली! ८ नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून आले होते निवडून

Kidney-Fairness cream : फेअरनेस क्रीममुळे किडनीचा गंभीर आजार...,प्रसिद्ध गायकाच्या दाव्याने खळबळ |VIDEO

SCROLL FOR NEXT