राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाला नांदेड जिल्ह्यात विरोध
हदगाव तालुक्यातील ११ गावांमधील शेतजमीन बाधित होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर शेतकऱ्यांच्या आंदोलनात
राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी शक्तिपीठ महामार्गाचा विरोध कमी होतान दिसत नाहीये. कोल्हापूर, सांगलीनंतर आता नांदेडमधील शेतकऱ्यांकडून या महामार्ग प्रकल्पाला विरोध केला जातोय. आता प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आलेत. या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला सत्ताधारी आमदाराने घरचा आहेर देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, गली गली में शोर है, नितीन गडकरी चोर है! अशा घोषणा देत शिवसेनेच्या आमदारानं सरकारच्या प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं.
महामार्गाविरोधात झालेल्या रस्ता रोकोमध्ये शेतकऱ्यांसोबत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार रस्त्यावर उतरले. या महामार्गात नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील अकरा गावातील शेती बाधित होत आहेत. शक्तिपीठ महामार्गावर गरजेचा नाहीये, तरीही तो केला जातोय. हा महामार्ग ज्या मार्गाने जाणार आहे, त्यात सुपीक जमीन बाधित होणार असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलाय.
या गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या रस्तारोकोत शिवसेनेचे हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर सहभागी झाले. या महामार्गात सुपीक जमीन जात आहे. त्यामुळे आपला विरोध असल्याचे आमदार कदम म्हणाले. या महामार्गाला लागणारे 80 हजार कोटी मराठवाडा वॉटर ग्रीड आणि सिंचनासाठी द्यावेत. याबाबत सभागृहात प्रश्न विचारणार असून मला सत्तेची परवा नाही, असेही आमदार बाबुराव कदम म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाला लागणारे 80 हजार कोटी मराठवड्याच्या दुष्काळ निवारणासाठी द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलीय.
राज्य सरकार या प्रकल्पासाठी ८० हजार रुपये खर्चे केले जात आहेत, त्यातून मुख्यमंत्री कोणाचं घर भरत आहेत. कोणासाठी हे महामार्ग केला जातोय. एकीकडे राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, पण सरकार हा प्रकल्प करण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सांगावं की, हा प्रकल्प कोणासाठी केला जातोय. ज्या प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणारे ८० हजार कोटी रुपये सरकारनं अदानी आणि अंबानीला फायदा मिळवून देण्याऐवजी मराठवाड्यात पाणी पुरवठ्यासाठी या पैशाचा उपयोग करावा, असं खासदार रवींद्र चव्हाण म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.