Shaktipeeth Expressway New Route Saam Tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shaktipeeth Mahamarg New Route Map: शक्तीपीठ महामार्गासाठी नवीन सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग १३ जिल्ह्यातून जाणार आहे. हा मार्ग कसा असणार आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा

९ गावातून जाणार

१३ जिल्ह्यांमधून जाणारा महामार्ग कसा असणार?

राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.शक्तीपीठ महामार्गाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. आता या महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्यात आले आहेत. यामुळे मार्ग ज्या गावातून जाणार होता त्यात बदल झाले आहेत. आता या नवीन आराखड्यानुसार या मार्गात नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी हा महामार्ग दहा गावातून जाणार होता.

नवीन सुधारित मार्गाला मंजुरी

शक्तीपीठ महामार्ग आता दोडामार्गे तळकट पंचक्रोशीतून जाणार आहे. यामध्ये अनेक इकोसेन्सिटिव्ह गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारचा हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाच्या कामात सुमारे एक लाख कोटी खर्च लागेल एवढा मोठा बदल करण्यात आला आहे. यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे.

शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला आहे. यानंतर हा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या आराखड्यात सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना विशेष महत्त्व मिळाले आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील काही गावे या महामार्गातून वगळण्यात आली आहे.

१३ जिल्ह्यातून जाणार महामार्ग

नव्या आराखड्यात १३ जिल्ह्यांचा समावेश आहे. १४ तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे. २१ धार्मिक स्थळांना जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास फक्त ८ तासात होणार आहे. १० तासांचा वेळ वाचणार आहे.

या गावांचा समावेश

शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आराखड्यानुसार, सावंतवाडीमधील केगद (चौकुळ), डेगवे, बांदा, पडवे माजगाव या गावाचंचा समावेश केला आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे या गावांचा समावेश आहे. शक्तीपीठ महामार्ग आता वर्धा, यवतमाळ, बीड, लातूर या जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये बदल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Honey Singh Concert: बुकिंग पूर्ण, शो हाऊसफुल तरीही हनी सिंगचा पुण्यातील कॉन्सर्ट रद्द, कारण काय?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवर बहिष्कार

सरकार सोने खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणणार नवा प्लॅन

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

SCROLL FOR NEXT