Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : संविधान दिनी शिक्षक गैरहजर; शिक्षकांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी

Shahapur Zp School : शाळेत वेळेवर न येणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे असे अनेक प्रकरणाबाबत अनेक लेखी तक्रार दिल्या होत्या. राष्ट्रीय कार्यक्रम साजरा न केल्याने संविधानाचा व राष्ट्रपुरुषांचा अवमान

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

शहापूर :  भारताच्या संविधान दिनाला दांडी मारून बेजबाबदारपणा करणाऱ्या कानवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या (Zp School) शिक्षकांवर कारवाई करावी. अन्यथा शाळेला टाळे ठोकू असा इशारा; कानवे येथील शाळा व्यवस्थापन समिती, पालक (Shahapur) व ग्रामस्थांनी जिल्हा शिक्षणाधिकारी व तालुका गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. (Live Marathi News)

शहापूर तालुक्यातील खरीड शैक्षणिक केंद्राच्या कानवे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका पल्लवी मेटकर व रुपाली सूर्यवंशी या रविवारी (२६ नोव्हेंबर) झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमास अनुपस्थित होत्या, ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करताच केंद्रप्रमुख बाबाजी धनगर यांनी उपस्थित राहून संविधान दिन साजरा केला. तसेच या अगोदर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीलाही शिक्षिका हजर नव्हत्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ डिसेंबरला शाळेला कुलूप ठोकणार 

शाळेत वेळेवर न येणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे असे अनेक प्रकरणाबाबत अनेक लेखी तक्रार दिल्या होत्या. राष्ट्रीय कार्यक्रम साजरा न केल्याने संविधानाचा व राष्ट्रपुरुषांचा अवमान होत असून या दोन महिला शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी; अन्यथा येत्या ५ डिसेंबरला शाळेला टाळे ठोकू; असा इशारा ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा परीषद ठाणे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Maharashtra News Live Update: बीड तालुक्यातील आंबे सावळी परिसरात जोरदार पाऊस

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT