Sahapur News  Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : रिल बनवत रस्त्यावरील खड्यात केली आंघोळ; शहापूर- सापगाव रस्ता दुरुस्तीची मागणी

Sahapur News : रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहन धारकांना या रस्त्यावरून येता जाता त्रास होत असतो. यामुळे अनेकदा रस्त्यासाठी आंदोलन देखील केली आहेत. मात्र प्रशासन अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाही 

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: शहापूर- सापगाव या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी होत असून यासाठी आंदोलन देखील करण्यात आलेले आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकरणी दखल घेतली जात नसल्याने शहापूरच्या तरुणांनी रिल बनवत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात आंघोळ करत आंदोलन केले आहे. 

शहापूर तालुक्यातील महत्वाचा रस्ता असणाऱ्या शहापूर- सापगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खड्डेमय रस्ता झाल्यामुळे सगळेच प्रवासी या रस्त्यावरुन प्रवास करतांना हैराण झाले आहेत. तर त्याठिकाणी दररोज छोट्या- मोठ्या अपघाताच्या घटना देखील घडतच आहेत. वाहनधारकांना होत असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा रस्ता बनवण्यासाठी आंदोलन देखील केली आहेत. मात्र प्रशासन अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाही. 

खड्ड्यातील पाण्यात बसून केली अंघोळ 

दरम्यान या रस्त्यावर संबधित यंञणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहापूरातील हंसराज महाले या एका युवकाने रिल बनवत चक्क खड्यात बसून खड्यात साचलेल्या पाण्यात आंघोळ करत आंदोलन केले आहे. अगदी स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद या युवकाने घेतला असून हा व्हिडिओ सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल होत आहे.

उद्घाटनापूर्वीच आष्टी येथील नवीन पुलाला खड्डे 
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी- चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीचा नवा पूल वाहतुकीस सूरू होवून वर्षभराचा कालावधी झाला आहे. मात्र वर्षभरातच पुलाच्या मध्यभागी खोलगट खड्डा पडला असुन हा खड्डा चुकवितांना अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. सदर खड्डा जीवघेणा ठरत असतांना खड्डा बुजविण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पुलाचे बांधकाम होवून वर्षभराचा कालावधी लोटत नाही, तोच पुलावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नाशिक, बुलढाण्यातील ZP च्या कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकीचे पैसे, २ पुरुषांचाही समावेश, धक्कादायक माहिती समोर

Amruta Deshmukh : मालिकांमध्ये हिरो-हिरोईनचे कास्टिंग कसं होते? 'बिग बॉस' अभिनेत्रीनं सांगितलं कटू सत्य

Mumbai Goa highway : मुंबई-गोवा महामार्गावरील आजपासून अवजड वाहतूक बंद, ३ टप्प्यात निर्बंध, वाचा सविस्तर

Shaniwar che Upay: शनिवारच्या दिवशी करा फक्त 'ही' ४ कामं; शनिदेवाच्या कृपेने संपत्ती वाढण्यास होणार मदत

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

SCROLL FOR NEXT